नियमित 3 खजुर खाण्याचे महिलांना आठवडाभरात मिळतील 'हे' आश्चर्यकारक फायदे

खजूर हे नैसर्गिकरित्या गोड असल्याने साखरेला पर्याय म्हणून आहारात त्याचा वापर केला जातो. मात्र आपल्याकडे आहारसंस्कृतीबाबत अनेक समज गैरसमज असल्याने त्याचा आहारात समावेश न केल्याने अनेक औषधोपयोगी फायद्यांपासून तुम्ही दूर राहता.  

Updated: Feb 9, 2018, 06:12 PM IST
नियमित 3 खजुर खाण्याचे महिलांना आठवडाभरात मिळतील 'हे' आश्चर्यकारक फायदे   title=

मुंबई : खजूर हे नैसर्गिकरित्या गोड असल्याने साखरेला पर्याय म्हणून आहारात त्याचा वापर केला जातो. मात्र आपल्याकडे आहारसंस्कृतीबाबत अनेक समज गैरसमज असल्याने त्याचा आहारात समावेश न केल्याने अनेक औषधोपयोगी फायद्यांपासून तुम्ही दूर राहता.  

खजुरातील आरोग्यदायी घटक 

खजुरामध्ये व्हिटॅमिन  बी 1, बी 2, बी3, बी5, ए1 आणि व्हिटॅमिन सी घटकदेखील मुबलक प्रमाणात आढळतात. सोबतच पोटॅशियम कमी प्रमाणात आणि सोडियमविरहीत असल्याने खजूर आरोग्याला फायदेशीर असते. 

विशिष्ट मौसमात खजुर खावे ?  

खजूर आरोग्यदायी असल्याने त्याचा आहारात अवश्य समावेश करावा. त्याकरिता विशिष्ट दिवसांचे बंधन नाही. खजूर हे थेट स्वरूपात खल्ले जाऊ शकते तसेच दूधात मिसळून मिल्कशेकच्या स्वरूपातही त्याचा वापर करता येऊ शकतो. 

खजुरामध्ये प्रोटीन आणि व्हिटॅमिन घटक मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने त्याच्या सेवनाने शरीराला उर्जा मिळते. दुबळ्या शरीरयष्टीच्या किंवा सतत थकवा जाणवणार्‍यांना उर्जा मिळण्यासाठी खजूर फायदेशीर ठरते. 

नियमित किमान 3 -4 खजूर खाण्याचे आरोग्यदायी फायदे 

खजूर वजन वाढवणार्‍यांसाठी फारच फायदेशीर ठरते. खजुरातील आयर्न घटक पचनासंबंधीचे आजार दूर करण्यास मदत करतात. 

थकवा जाणवणं, रक्त कमी कमी असणार्‍यांच्या आहारात नियमित खजुराचा समावेश केल्याने फायदा होऊ शकतो. 

हृद्यविकार असणार्‍यांसाठी खजूराचे सेवन फायदेशीर ठरते. कोलेस्टेरॉलचे प्रमाण आटोक्यात ठेवण्यासाठी खजूर फायदेशीर आहे. 

खजुरातील सेलेनियम, मॅग्नेशियम घटक हाडांना मजबुती देण्यास मदत करतात. 

मासिकपाळीच्या दिवसात स्त्रियांना होणारा त्रास, पोटात क्रॅम्स येण्याचा त्रास आटोक्यात आणण्यासाठी मदत करते.