ताजे खजूर खाण्याचे '6' आरोग्यदायी फायदे

खजूर हा नैसर्गिकरित्या गोड असल्याने शरीराराला उर्जा देण्यासाठी, रक्त वाढवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. 

Updated: Aug 21, 2018, 12:12 PM IST
ताजे खजूर खाण्याचे '6' आरोग्यदायी फायदे   title=

मुंबई : खजूर हा नैसर्गिकरित्या गोड असल्याने शरीराराला उर्जा देण्यासाठी, रक्त वाढवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. खजूर तुम्ही अनेकदा सुकलेला किंवा काळा, चॉकलेटी स्वरूपात खाल्ला असेल. मात्र ताज्या स्वरूपातील खजूरदेखील आरोग्याला फायदेशीर आहे. 

ताज्या खजूराचे आरोग्यदायी फायदे  

ताज्या स्वरूपातील खजूर देखील फर्टिलिटी सुधारण्यासाठी, रक्त वाढवण्यासाठी, शरीराची रोगप्रतिकारक्षमता सुधारण्यासाठी, मदत करते. मग पहा अशा स्वरूपात खजूर खाल्ल्याने होणारे आरोग्यदायी फायदे.  

फायबर घटक - 

खजूरामध्ये सोल्युबल आणि इनसोल्युबल फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे ताज्या खजुरामुळे बद्धकोष्ठता, ब्लोटिंगचा त्रास  कमी होण्यास मदत होते. 

मिनरल्स -  

ताज्या खजूरामध्ये मुबलक प्रमाणात मिनरल्स असतात. त्यामुळे मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचा नैसर्गिक स्वरूपात शरीराला पुरवठा करण्यास
खजूर फायदेशीर आहे. 

व्हिटॅमिन्स  - 

ताज्या खजूरामध्ये व्हिटॅमिन घटक  मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे त्वचेचं नुकसान टाळण्यासाठी, केसांमधील शुष्कता कमी करण्यासाठी मदत होते. 

कॅलरी - 

तुम्ही कॅलरीचं गणित सांभाळून आहाराचं पथ्यपाणी सांभाळत असाल तर आहारात नक्कीच ताज्या खजुराचा समावेश करा. सुमारे 80 ग्रॅम ताज्या खजुरातून 142 कॅलरीज मिळतात. यामुळे भूकेवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. 

लो ग्लॅस्मिक इंडेक्स -

ताज्या खजुरामुळे शरीराला एनर्जी मिळण्यास मदत होते. सोबतच मूड स्विंग्स कमी होतात. 

प्रोटीन्स - 

प्रोटीन्समुळे मसल्सला मजबुती मिळण्यास मदत होते.