मुंबई : तुम्ही भाजलेले चणे खाल्लेच असतील. केवळ स्वाद म्हणून तुम्ही जर चणे खात असाल तर दररोज चणे खाण्यास सुरुवात करा. कारण हे चणे खाल्ल्याने शरीरास अनेक फायदे होतात. भाजलेल्या चण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम, आर्यन आणि व्हिटामिन असते. भाजलेल्या चण्याचे आरोग्यासाठी इतके फायदे आहेत तर दररोज किती प्रमाणात त्याचे सेवन करावे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. त्याचेही उत्तर आहे आमच्याकडे. वसंत कुंज स्थित इंडियन स्पाइनल इंजरी सेंटर की सीनियर डायटीशियन डॉ. हिमांशी शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने दररोज ५० ते ६० ग्रॅम चणे खाल्ले पाहिजेत. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.
प्रतिकारक्षमता वाढते
दररोज नाश्त्यामध्ये अथवा जेवणाच्या आधी ५० ग्रॅम भाजलेले चणे खाल्ल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते. रोगप्रतिकारक क्षमता वाढल्याने अनेक आजारांपासून रक्षण होते. तसेच ऋतू बदल झाल्याने शारिरीक समस्याही दूर होतात.
लठ्ठपणा कमी होतो
जर तुम्ही लठ्ठपणाने ग्रस्त असाल तर भाजलेले चणे खाणे फायदेशीर ठरते. दररोज भाजलेले चणे खाल्ल्याने लठ्ठपणाच्या समस्येवर मात करता येते. याच्या सेवनाने शरीरातून अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.
युरिनसंबंधीच्या समस्या दूर होतात
भाजलेले चणे खाल्ल्याने युरिनसंबंधीच्या समस्या दूर होतात. ज्यांना सतत लघवीला होत असेल त्यांनी चणे आणि गूळ खावे. काही दिवसांतच आराम पडेल.
नपुंसकता दूर होते
भाजलेले चणे मधासोबत खाल्ल्याने नपुसंकता दूर होते. एखाद्या पुरुषाचे वीर्य पातळ असेल तर चणे खाल्ल्याने फायदा होतो.
बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळते
ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे अशा व्यक्तींनी नियमितपणे चण्याचे सेवन करावे. यामुळे आराम मिळतो. बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास तुम्हाला दिवसभर आळसावल्यासारखे वाटते.
पाचनशक्ती वाढते
पाचनशक्ती वाढवण्यासाठी दररोज चण्याचे सेवन करणे फायदेशीर
ठरते. यामुळे रक्त शुद्ध होते. तसेच त्वचा उजळते. चण्यामध्ये फॉस्फरस असते ज्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढते.
मधुमेहावर गुणकारी
भाजलेले चणे खाल्ल्याने डायबिटीजच्या रुग्णांना फायदा मिळतो. भाजलेले चणे ग्लुकोजची मात्र कमी करतात. डायबिटीजच्या रुग्णांनी नियमितपणे चणे खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी कमी होते.