Alcohol | दारूसोबत चुकूनही खाऊ नये या गोष्टी; आरोग्यासाठी ठरू शकतात अत्यंत घातक

दारूसोबत पुढील स्नॅक्स तुम्ही खात असाल तर सावधान... जाणून घ्या दारू सोबत कोणते स्नॅक्स  खाऊ नये

Updated: Aug 7, 2021, 01:58 PM IST
Alcohol | दारूसोबत चुकूनही खाऊ नये या गोष्टी; आरोग्यासाठी ठरू शकतात अत्यंत घातक title=

मुंबई : दारू आपल्या आरोग्याला घातक असते. हे माहित असूनही अनेक लोकं दारूचे सेवन करतात. दारू पिल्याने कर्करोग तसेच अन्य आजारांना सामोरे जावे लागू शकते.तसेच दारूसोबत पुढील स्नॅक्स तुम्ही खात असाल तर सावधान... जाणून घ्या दारू सोबत कोणते स्नॅक्स  खाऊ नये.

Fries पासून नुकसान

harmful effects of alcohal food habits fries burger spicy food

फ्राइजमध्ये सॅच्युरेटेड फॅट असते. फाइजला वाइन किंवा बिअरसोबत पचवणे खूप कठीण असते. दोन्हींचे सेवन सोबत केल्याने पोट खराब होऊ शकते. यामध्ये असलेले सोडियममुळे तुमच्या शरिरात डिहायड्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते. 

चॉकलेट

चॉकलेटमध्ये फॅट, कोको आणि कॅफिनचे प्रमाण अधिक असते. बियर सोबत चॉकलेट खाल्ल्याने तुम्हाला अधिक नशा होऊ शकतो. तसेच पाण्याची तहान खूप लागते.

Burger खाऊ नये.

harmful effects of alcohal food habits fries burger spicy food
दारू पिताना त्यासोबत कधीही बर्गर खाऊ नये. या गोष्टींना पचवायला लिवरला जास्त मेहनत घ्यावी लागते. 

आंबट फळ
harmful effects of alcohal food habits fries burger spicy food
दारू पिताना संत्री सारखे फळ खाऊ नयेत. या फळांमध्ये ऍसिडचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पचनसंस्थेत अडचण निर्माण होऊ शकते.

Spicy Food खाऊ नयेत.

harmful effects of alcohal food habits fries burger spicy food
दारू सोबत स्पाइसी फूड कधीही खाऊ नयेत. हे योग्य संतुलन नाही. मसालेदार पदार्थांमद्ये कॅप्साइसिन असते. त्यामुळे हृदयात हीट वाढण्याची समस्या निर्माण होऊ शकते.