Garba Benefits: गरबा खेळण्याचे 'हे' फायदे वाचून लगेचच थिरकण्यास सुरुवात कराल

एक व्यायाम प्रकार म्हणूनही गरब्याकडे पाहिलं जातं. त्याचे शरीरावर होणारे परिणाम अत्यंत गुणकारी. 

Updated: Oct 3, 2022, 04:27 PM IST
Garba Benefits: गरबा खेळण्याचे 'हे' फायदे वाचून लगेचच थिरकण्यास सुरुवात कराल  title=
Garba Benefits After reading these benefits of playing Garba you will start shaking immediately nz

Garba Benefits:  सध्या संपूर्ण देशात शारदीय नवरात्रोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. सर्वत्र भक्तिमय माहोल दिसत आहे. अनेकजण देवीची पूजाअर्चा आणि आराधना करण्यात मग्न दिसत आहेत. त्यातच एक आणखी गोष्ट दणक्यात पार पडताना दिसतेय. ती म्हणजे रास गरब्याचे कार्यक्रम. (Garba Benefits After reading these benefits of playing Garba you will start shaking immediately nz)

लोकनृत्य प्रकारात मोडल्या जाणाऱ्या या नृत्याचं वेड सानथोरांपासून प्रत्येकामध्ये पाहायला मिळतं. गरबा खेळायला आवडत नाही, असं म्हणणारे फाक क्वचितच. कारण, या नृत्यप्रकाराचे फायदेही तितकेच आहेत. एक व्यायाम प्रकार म्हणूनही गरब्याकडे पाहिलं जातं. त्याचे शरीरावर होणारे परिणाम अत्यंत गुणकारी. 

1. गरबा हृदयाच्या आरोग्यासाठी फायद्याचा (Garba is beneficial for heart health)
गरबा खेळताना शरीराची मोठ्या प्रमाणात हालचाल होत असते. हृदयाचे स्नायू मजबूत होतात ज्यामुळे तुमचे हृदय निरोगी राहते. रक्ताभिसरण योग्य प्रमाणात होऊन ऑक्सिजनची पातळी देखील वाढते.

 Habit can ruin your life : यशस्वी व्हायचंय? तातडीने 'या' सवयी बदला...

2. फुफ्फुस मजबूत होतात (Lungs become stronger)
गरबा खेळताना त्यात गतीचंही भान ठेवावं लागतं. त्यामुळे तुम्हाला दीर्घ श्वास घेऊन सोडावा लागतो. ही प्रक्रिया जवळपास प्राणायामाच्या जवळ जाणारी असते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असल्यास प्राणायाम करण्याचा सल्ला डॉक्टरही देतात. 

3. तणाव कमी होतो (Reduces stress)
गरबा खेळल्याने तणाव कमी होतो असतो. आपली एकाग्रता वाढते. इतरांच्या सोबतीने आपण गरबा खेळत असतो त्यामुळे आपल्या मनात इतर विचार घर करत नाहीत. 

4. वजन कमी होण्यास मदत होते (Helps in weight loss)
गरबा खेळताना फक्त आपल्या हाता पायांची हालचाल होत नाही तर पुर्ण शरीराला चालना मिळते. शरीरातील चरबी वेगाने कमी होते. 

आणखी वाचा - Personality Test: तुमच्या पर्सनॅलिटीचं रहस्य कपाळावरून जाणून घ्या , सिक्रेट माहिती आता आली समोर

(Disclaimer: वरील माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)