Morning tips : तुम्हाला सकाळी उठल्यावर सुस्ती येते का? मग दिवसभर उत्साही राहण्याचे 'हे' उपाय

भरपूर कामं पडलेली असतात, पण कामांना हात लावण्याची इच्छाच होत नाही. काहीही न करता बसून राहावं, पडून राहावं असं वाटायल लागतं. अंगात ऊर्जाच नाही असं वाटायला लागतं. यालाच सुस्तपणा असं म्हणतात. असाच सुस्तपणा सकाळी उठल्यावर देखील तासभर आपला सुस्तपणा जात नाही. 

Updated: Oct 14, 2022, 12:14 PM IST
Morning tips :  तुम्हाला सकाळी उठल्यावर सुस्ती येते का? मग दिवसभर उत्साही राहण्याचे 'हे' उपाय  title=

Morning tips : भरपूर कामं पडलेली असतात, पण कामांना हात लावण्याची इच्छाच होत नाही. काहीही न करता बसून राहावं, पडून राहावं असं वाटायल लागतं. अंगात ऊर्जाच नाही असं वाटायला लागतं. यालाच सुस्तपणा असं म्हणतात. असाच सुस्तपणा सकाळी उठल्यावर देखील तासभर आपला सुस्तपणा जात नाही. 

रात्री 7 ते 8 तास झोप मिळत असली तरी दिवसभर लोकांना झोप येत असते. बरेच लोक आहेत जे रात्री लवकर झोपतात परंतु त्यांना सकाळी उठण्यासाठी बराच वेळ घेतात. तुम्हाला जर दिवसभर ताजेतवाने वाटण्यासाठी आणि झोपेतून सुटण्यासाठी हे लोक चहा, कॉफी आणि सिगारेटचे भरपूर सेवन करतात. परिणाम त्याचा आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो.

जर तुम्हालाही सकाळी उठल्यानंतर या सर्व समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर आज आम्ही तुम्हाला या समस्येवर मात करण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे दररोज सकाळी उठल्यानंतर तुम्हाला फ्रेश वाटेल आणि तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळेल. 

ताजेतवाने उठण्यासाठी चांगली झोप आवश्यक 

जर तुम्हाला सकाळी लवकर आणि ताजेतवाने उठायचे असेल तर रात्री चांगली झोप घेणे आवश्यक आहे. याचा अर्थ दिवसा अन्न खाल्ल्यानंतर कॅफिनचे सेवन करू नका. याशिवाय अल्कोहोल आणि स्क्रीनपासून दूर राहा. तसेच, झोपण्याची एक निश्चित वेळ उठण्याची वेळ निश्चित करा आणि दुसऱ्यादिवशी पण त्याचवेळी झोपण्याचा प्रयत्न करा.

वीकेंडलाही लवकर उठणे

जर तुम्हाला रोज सकाळी लवकर उठायचे असेल तर त्यासाठी तुम्ही तुमची झोप आणि जाग राहण्याचे चक्र निश्चित करणे महत्त्वाचे आहे. बहुतेक लोक वीकेंडला खूप उशिरा झोपतात आणि उशिरा उठतात. वीकेंडला असे केल्याने पुढील दिवसांचे झोपेचे चक्र बिघडते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर फ्रेश वाटत नाही. विशेषत: वीकेंडनंतर ऑफिसला गेल्यावर बहुतेकदा ही समस्या उद्भवते. अशा परिस्थितीत वीकेंडलाही तुम्ही तुमचे झोपेचे चक्र कायम राखणे महत्त्वाचे आहे.

वाचा : दिवाळीत 'या' गोष्टींची विशेष काळजी घ्या, घरात कायम भरभराट होईल!

अलार्म वाजण्यापूर्वी उठणे

अनेकदा लोक रात्री झोपण्यापूर्वी सकाळचा अलार्म लावतात. पण सकाळी अलार्म वाजल्यानंतरही ते झोपतात किंवा सतत अलार्म बंद करत राहतात. असे केल्याने तुमची झोप तर खुलते पण आळसापणामुळे तुम्ही अंथरुणाला धरूनच राहतात. त्यामुळे तुम्हाला खूप थकवा जाणवतो. अशा परिस्थितीत सकाळी अलार्म वाजल्याबरोबर लगेच उठणे महत्वाचे आहे.

सकाळी उठल्याबरोबर पाणी प्या

रात्री झोपताना आणि श्वास घेतल्याने तुमच्या शरीरातून भरपूर द्रव बाहेर पडतात. ज्यामुळे तुमचे शरीर सकाळपर्यंत निर्जलित होते. यामुळे तुम्हाला सुस्ती आणि झोप येते. अशा स्थितीत सकाळची सुरुवात पाण्याने करणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला सकाळी उठून ताजेतवाने वाटायचे असेल तर पाणी हा एक निश्चित उपाय आहे. सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

व्यायाम

सकाळी उठल्याबरोबर जर तुम्ही व्यायाम किंवा प्राणायाम केलात तर तुमच्या शरीराला खूप ताजेतवाने वाटते आणि तुम्हाला सुस्ती आणि आळस येत नाही.

न्याहारीसाठी आरोग्यदायी गोष्टी खा

तुम्ही सकाळी काय खाता यावर तुमचा संपूर्ण दिवस अवलंबून असतो. अशा परिस्थितीत सकाळी उठणे आणि निरोगी नाश्ता घेणे महत्वाचे आहे. तुम्ही सकाळी बिया, नट, फळे किंवा पोहे, ओट्स इत्यादींचे सेवन करू शकता. यामुळे दिवसभर शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि दिवसभर ताजेतवाने वाटते.