विसरभोळेपणामुळे तब्येतीवर परिणाम, स्मृती वाढवण्यासाठीचे सोपे उपाय

आजच्या तंत्रज्ञानाच्या जगात सर्व गोष्टी अगदी सोप्या मार्गाने मिळतात.    

Updated: Sep 16, 2020, 07:10 PM IST
विसरभोळेपणामुळे तब्येतीवर परिणाम, स्मृती वाढवण्यासाठीचे सोपे उपाय title=

मुंबई : आजच्या तंत्रज्ञानाच्या जगात सर्व गोष्टी अगदी सोप्या मार्गाने मिळतात. कोणत्याही गोष्टीसाठी अधिक मेहनत घ्यावी लागत नाही. एका क्लिकवर महत्त्वाच्या गोष्टी माहिती पडतात. त्यामुळे तंत्रज्ञान आपल्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. परंतु याचे अनेक तोटे आपल्या आरोग्याला होत असतात. तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे आपल्या स्मरणशक्तीवर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे स्वतःचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य निट ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. 

डॉक्टर नेहमी सांगतात झोप अपूरी झाल्यामुळे स्मरणशक्ती कमी होते. त्यामुळे तरूणांसाठी नऊ तास आणि प्रौढांसाठी सात ते आठ तास झोपणे आवश्यक आहे. शिवाय आजच्या या धकाधकीच्या धवपळीच्या जीवनात प्रत्येक जण तणावाखाली जगत आहे. तणावाला आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी मॉर्निंग वॉक, दररोज प्राणायाम, ध्यान आणि दीर्घ श्वास यांसारख्या पर्यायांचा वापर करायला हवा. 

भोपळ्याच्या बीया - 
भोपळ्याच्या बीयांमध्ये झिंक घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे मानसिक स्वास्थ्य सुधारायला मदत होते. सोबतच स्मरणशक्तीदेखील सुधारते.  

टोमॅटो -
टोमॅटोमध्ये अ‍ॅन्टी ऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात असतात. नियमित त्याचा सलाडमध्ये समावेश केल्यास स्मरणशक्ती मजबूत राहण्यास मदत होते. 

ऑलिव्ह ऑईल - 
ऑलिव्ह  ऑईलचा आहरात समावेश केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. यामुळे मेंदूचं आरोग्य जपायला मदत होते.