सिडनी : वंद्यत्वाशी झगडणाऱ्या दाम्पत्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. वंश पुढे वाढविण्यासाठी मानवी अंडे बनविण्यात संशोधकांना यश आले आहे.
एडिनबरा विद्यापीठातील संशधकांनी या प्रयोगात यश मिळाल्याचे म्हटले आहे. संशोधकांनी असेही म्हटले आहे की, वंद्यत्व तसेच, किमोथेरेपी तसेच, रेडियोथेरेपीचा सामना केलेल्या महिलांनाही याचा फायदा मिळणार असल्याचा संशोधकांचा दावा आहे.
दरम्यान, यापूर्वी उंदरावर अशा प्रकारचा प्रयोग यशस्वी करण्यात आला होता. मात्र, मानवी अंड्याबाबत काही समस्या निर्माण झाली होती. संशोधकांच्या चमूने सखोल संशोधन करत ही समस्या दूर केली. संशोधनात महत्तवाची जबाबदारी पार पाडलेल्या प्रोफेसर ई टेल्फर यांनी म्हटले आहे की, प्रयोगाचा निष्कर्ष अत्यंत सकारात्मक आहे. तसेच, मानवी वंश वाढविण्यासाठी हा शोध अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.