fever in Monsoon: पावसाळ्यात ताप येतोय तर या 3 चाचण्या नक्की करुन घ्या

ताप येत असला तर त्याकडे कधीच दुर्लक्ष करु नये. कारण ताप येण्याची कारणं वेगवेगळी असतात.

Updated: Jul 20, 2022, 12:08 AM IST
fever in Monsoon: पावसाळ्यात ताप येतोय तर या 3 चाचण्या नक्की करुन घ्या title=

मुंबई : बहुतेक लोक पावसाळ्यात आजारी पडतात. त्यापैकी अनेक जण तापाच्या समस्येने त्रस्त असतात. या मोसमात लोकांना सर्दी, खोकला, ताप याचा सामना करावा लागतो. सध्या व्हायरल तापामुळे अनेक जण आजारी पडत आहेत. यापासून लांब राहण्यासाठी सकस आहार घेतला पाहिजे. परंतु काही वेळा ताप बराच काळ राहतो.

तुम्हालाही पावसाळ्यात बराच वेळ ताप येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. अशा परिस्थितीत काही चाचण्या करून घ्या. पावसाळ्यात ताप आल्यास कोणत्या चाचण्या कराव्यात जाणून घेऊया.

मलेरिया-

मलेरिया हा पावसाळ्यात आढळणारा आजार आहे. हा रोग मादी डासांच्या चाव्याव्दारे पसरतो. हा डास साचलेल्या पाण्यात आढळतो. तापासोबत थंडी वाजून येणे, थरथर कापणे, घाम येणे आणि अंगदुखी यांसारखी लक्षणे दिसल्यास मलेरियाची चाचणी करून घ्यावी.

टायफॉइड -

हा पावसाळ्यात होणारा आजार आहे. हा आजार दूषित अन्न आणि पाण्याच्या सेवनाने पसरतो. टायफॉइडमध्ये दिवसा ताप जास्त राहतो, तर सकाळी शरीराचे तापमान कमी होते.

डेंग्यू-

डेंग्यू हा एक विषाणू संसर्ग आहे जो मादी एडिस इजिप्ती डासाच्या चाव्याव्दारे होतो. डेंग्यू ताप ही पावसाळ्यात बहुतेक लोकांना भेडसावणारी सर्वात सामान्य समस्या आहे. जर तुम्हाला खूप ताप येत असेल तसेच डोकेदुखी, त्वचेवर पुरळ, डोळ्यांच्या मागे दुखणे आणि अंगदुखीचा त्रास होत असेल तर या डेंग्यूची चाचणी नक्कीच करून घ्या.

सूचना : हा फक्त एक सामान्य सल्ला आहे. कोणतीही गोष्ट करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नेहमी घ्यावा.