Signs Of Fatty Liver: फॅटी लिव्हरची समस्या असल्यास पायांमध्ये दिसतात 'हे' बदल; जाणून घ्या लक्षणं

Signs Of Fatty Liver Disease On Feet: यकृताच्या कार्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड झाला तर तर त्याचा आपल्या एकूण आरोग्यावर काय परिणाम होतो. सध्याची जीवनशैली, मद्याचं सेवनआणि इतर अनेक कारणांमुळे यकृतावर वाईट परिणाम होऊ लागतात.

सुरभि जगदीश | Updated: Jul 23, 2024, 06:35 PM IST
Signs Of Fatty Liver: फॅटी लिव्हरची समस्या असल्यास पायांमध्ये दिसतात 'हे' बदल; जाणून घ्या लक्षणं title=

Signs Of Fatty Liver Disease On Feet: आपल्या शरीरातील महत्वाच्या अवयवांपैकी एक अवयव म्हणजे यकृत. मानवी शरीरातील फंक्शन योग्य पद्धतीने सुरु ठेवण्यासाठी मदत यकृत मदत करतं. यकृताच्या मदतीने आपलं शरीर डिटॉक्स होतं. या अवयवाद्वारे अनेक केमिकल्स योग्यरित्या कंट्रोल केली जातात. याशिवाय ग्लुकोजचं उत्पादन आणि साठवण करून ब्लड शुगर संतुलन राखण्यातही महत्त्वाची भूमिका बजावते. 

जर यकृताच्या कार्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड झाला तर तर त्याचा आपल्या एकूण आरोग्यावर काय परिणाम होतो. सध्याची जीवनशैली, मद्याचं सेवनआणि इतर अनेक कारणांमुळे यकृतावर वाईट परिणाम होऊ लागतात. अशा परिस्थितीत आजकाल अनेकांना फॅटी लिव्हरचा त्रास जाणवू लागला आहे. जर फॅटी लिव्हरचा त्रास असलेल्या व्यक्तींच्या शरीरात काही लक्षणं दिसून येतात. यावेळी वेळीच उपचार करणं फायदेशीर ठरेल. जाणून घेऊया फॅटी लिव्हरची काय लक्षणं दिसून येतात. 

पायांमध्ये सूज येणं

फॅटी लिव्हरच्या समस्येममध्ये रुग्णाच्या पायाला सूज येण्याची समस्या जाणवते. फॅटी लिव्हरच्या समस्येचं प्रारंभिक लक्षण मानलं जातं. फॅटी लिव्हरच्या आजारामुळे पायांमध्ये एक विशेष प्रकारचा द्रव पदार्थ साचू लागतं यामुळे पायांना सूज येते. ही सूज वेदनादायक असण्याची शक्यता असते. काही वेळा पायांच्या नसांवर जास्त दाब आल्याने पायांना सूज येऊ शकते. 

पाय सुन्न होणं

हिपेटायटीस सी संसर्ग किंवा फॅटी लिव्हर समस्येच्या बाबतीत पाय सुन्न होणं आणि मुंग्या येणे या तक्रारी दिसून येण्याची शक्यता असते. या स्थितीला पॅरेस्थेसिया म्हणून ओळखलं जातं. हे फार कमी प्रकरणांमध्ये घडताना दिसतं. यकृताशी संबंधित काही समस्या असल्यास आणि वेळोवेळी पाय सुन्न होण्याची तक्रार उद्भवू शकते. 

पायांच्या जॉईंट्समध्ये होणाऱ्या वेदना

पायामध्ये 30 पेक्षा जास्त जॉईंट्स असतात. जर एखाद्याला फॅटी लिव्हर रोग असल्यास, त्यांच्या पायांमध्ये द्रव तयार होऊ लागतो, ज्यामुळे पायांमध्ये वेदना वाढते. याशिवाय अतिरिक्त दबाव पायांच्या जॉईंट्सवरही पडतो. परिणामी त्या व्यक्तीला हालचाल करणेही कठीण होते.

पायांमध्ये सतत खाज येणं

यकृताच्या आजाराच्या व्यक्ती खाज येण्यासारख्या समस्या वारंवार दिसून येऊ शकतात. त्यामुळे पायांना सतत खाज येणं हे यकृताच्या आजाराचं लक्षण आहे. जेव्हा कोलेस्टॅटिक यकृत रोग होतो तेव्हा पित्त वाहिनी ब्लॉक होतं. पित्त नलिका ही एक प्रकारची पातळ नळी असते, जी यकृताकडून लहान आतड्यात जाते. जेव्हा यकृताच्या समस्यांमुळे पित्त नलिका ब्लॉक होतात, तेव्हा शरीरात द्रव जमा होऊ लागतो. अशा परिस्थितीत, त्या प्रभावित भागांना सतत खाज सुटणं किंवा जळजळ होण्याची समस्या दिसू लागते. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)