मुंबई : चुकीची लाईफस्टाईल आणि खाण्याच्या अयोग्य पद्धती यामळे आजकाल बहुतेकांना वजन वाढीच्या समस्येला सामोरं जावं लागतं. अशातच सतत बसून काम केल्यामुळे बेली फॅट म्हणजेच पोटाजवळची चरबी देखील वाढू लागते. वजन कमी करण्यासाठी किंवा फीट राहण्यासाठी आपण ना-ना पद्धतीचा वापर केला असेल. मात्र आहारात केवळ एका फळाचा समावेश तुम्हाला वजन कमी करण्यासाठी भरपूर मदत करू शकतो.
वजन कमी करायचं असल्यास अंजीराचं नियमित पद्धतीने सेवन केलं पाहिजे. अंजीरमध्ये लोह, कॅल्शियम, जीवनसत्त्वं, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबर आणि प्रथिनं भरपूर प्रमाणात असतात. जे तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरतं.