मुंबई : कोविड-19 महामारीच्या काळात औषधांच्या विक्रीने नवे रेकॉर्डच केले. डोलो 650 या महामारीच्या काळात सर्वात Prescribe होणारं औषध बनलं. यादरम्यान डोलो 650 च्या 350 कोटी गोळ्यांची विक्री झाली. सुमारे 567 कोटी रुपयांच्या औषधांची विक्री झाली असून कोरोनाच्या काळात या औषधाला जोरदार मागणी असल्याचं दिसून आलं.
दुसऱ्या लाटेमध्ये डोलो 650 या गोळ्यांची विक्री प्रचंड झाल्याची नोंद आहे. एप्रिल 2021 मध्ये, डोलो 650 टॅब्लेटची 49 कोटी रुपयांची विक्री झाली. हेल्थकेअर रिसर्च फर्म IQVIA नुसार, या औषधाची आतापर्यंतची ही सर्वाधिक विक्री आहे. यामुळेच लोकं याला भारताचा राष्ट्रीय टॅबलेट म्हणू लागलेत.
1973 मध्ये जी.सी. Micro Labs Ltd (Micro Labs Ltd.) G.C. Surana यांनी स्थापन केलेली कंपनी, 650 mg Paracetamol सह डोलो 650 गोळी तयार करते. इतर कंपन्या 500 मिलीग्राम पॅरासिटामॉलचा समावेश त्यांच्या प्रोडक्टमध्ये करतात. फार्मा कंपन्या पॅरासिटामोल त्यांच्या कॉपीराइट अंतर्गत Crocin, Dolo किंवा Calpol या नावांनी विकतात.
दरम्यान डोलोची विक्री जास्त का आहे हे स्पष्ट होत नाही. स्ट्रॅटफॉर्ड हे नाव डोलोच्या यशाचं एक कारण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणं आहे. दुसरे कारण म्हणजे डोलो 650 मिलीग्राम पॅरासिटामॉलसह येते आणि त्यामुळे ते तापाविरूद्ध अधिक प्रभावी असल्याचं सिद्ध झालंय.