बसल्या-बसल्या तुमचे हात पाय सुन्न होतात? मग हे गंभीर आजाराचे संकेत आहे

हे का होतं? यामागची कारणं काय? तसेच हे कसं टाळलं जाऊ शकतं? याबद्दल जाणून घ्या.

Updated: Mar 11, 2022, 06:49 PM IST
बसल्या-बसल्या तुमचे हात पाय सुन्न होतात? मग हे गंभीर आजाराचे संकेत आहे title=

मुंबई : बऱ्याचदा लोकांना हाताला किंवा पायाला मुंग्या येण्याच्या समस्या उद्भवतात. यामुळे शरीराचा एक विशिष्ट भाग काही काळासाठी सुन्न होतो. ज्यामुळे त्या भागात काहीही हालचाल करता येत नाही. परंतु हे लक्षात घ्या की, मुंग्या येण्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करु नका. विशेषता पायांना मुंग्या येण्याच्या समस्या जास्त उद्भवतात. त्यामुळे अशाप्रकारे पाय सुन्न होणे हे शरीराच्या आत वाढणाऱ्या काही मोठ्या आजाराचे लक्षण असू शकते. कारण यामुळे चालणे तर अवघड होतेच, शिवाय अनेक वेळा रुग्णालयात दाखल व्हावे लागते. परंतु हे का होतं? यामागची कारणं काय? तसेच हे कसं टाळलं जाऊ शकतं? हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हात किंवा पाय अचानक सुन्न का होतात?

एकाच स्थितीत बराच वेळ बसल्याने किंवा झोपून राहिल्याने तेथे रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो. त्यामुळे हात-पाय सुन्न होतात. दुसऱ्या शब्दांत, हात आणि पायांमध्ये मुंग्या येणे जाणवते आणि ते सामान्यपणे काम करणे थांबवतात. या सुन्नतेकडे जास्त काळ लक्ष न दिल्यास हृदयविकाराचा झटका येण्याचा धोकाही वाढतो. आज आम्‍ही तुम्‍हाला सांगत आहोत की हात-पाय सुन्न होऊ नयेत यासाठी काय करावे.

घट्ट कपडे घालणे टाळा

जर तुम्हाला खूप घट्ट कपडे घालण्याची आवड असेल, तर ती लवकर बदला. याचे कारण म्हणजे घट्ट पँट किंवा टॉप्स तुमच्या शरीरातील रक्तप्रवाहात अडथळा आणू लागतात. त्यामुळे हात किंवा पाय यांच्या रक्ताभिसरणात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे एकतर हे कपडे बदला किंवा थोडे सैल करा.

बसताना आणि झोपताना स्थिती बदला

आपल्या शरीरात अनेक शिरा आहेत, ज्या रक्त आणि ऑक्सिजन एका भागातून दुसऱ्या भागात पोहोचवण्याचे काम करतात. जर आपण एकाच स्थितीत बराच वेळ बसलो किंवा झोपलो तर त्या नसा बंद होतात. ज्यामुळे तुमची बसण्याची स्थिती वेळोवेळी बदलत राहा.

उंच टाचांच्या सँडल घालणे टाळा

अनेक वेळा लोक, विशेषत: स्त्रिया, असे बूट किंवा चप्पल घालतात, जे त्यांच्या पायात बसत नाहीत. विशेषत: अनेक स्त्रिया उंच टाचांच्या सँडल घालणे पसंत करतात, त्यामुळे त्यांच्या पायाची बोटे दाबली जातात आणि रक्त वाहिण्या नीट काम करता येत नाही. अशा परिस्थितीत, पाय अचानक सुन्न होऊ शकतात. हे टाळण्यासाठी नेहमी आरामदायक शूज आणि सँडल घाला आणि उंच टाचांचे शूज घालणे टाळा.

खोबरेल तेलाने पायाची मालिश करा

जर तुमचे पाय अनेकदा सुन्न होत असतील तर आठवड्यातून एक किंवा दोन दिवस हलक्या हातांनी खोबरेल तेलाने पायाची मालिश करा. या मसाजमुळे पायांमधील रक्ताभिसरण वाढण्यास मदत होते तसेच अधूनमधून येणारा सुन्नपणा लवकर बरा होतो. यासोबतच पायाचे तळवे कोमट कपड्याने किंवा पाण्याने भिजवावेत. त्यामुळे रक्ताच्या शिरा व्यवस्थित काम करत राहतात.

नियमित व्यायामाची सवय लावा

हात आणि पायांचे रक्ताभिसरण व्यवस्थित राहण्यासाठी नियमित व्यायाम करण्याची सवय लावा. दररोज 500 ते 1 हजार पावले चाला. पोहणे आणि सायकलिंग हे हात आणि पाय सुन्न न करण्यासाठी उत्तम व्यायाम मानले जातात. रोजचा काही शारीरिक व्यायाम तुम्हाला या समस्येपासून दूर ठेवू शकतो.

डॉक्टरांच्या मते, अधूनमधून पाय किंवा बोटं सुन्न होणे गंभीर मानले जात नाही. मात्र, जर तुम्हाला ही समस्या वारंवार येत असेल. जसे की, आवाज थरथरणे, हात-पाय थरथरणे तर लगेच डॉक्टरांना दाखवा. ते या सुन्नपणाचे खरे कारण शोधून काढतात आणि त्यावर ताबडतोब उपचार सुरू करतात, जेणेकरुन तुम्ही मोठ्या संकटात पडणे टाळू शकाल.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.)