Men`s Health : सायकलिंगमुळे पुरुष नपुंसक होतायत; तुम्हीही करताय का 'ही' चूक?

Health Tips : असं म्हणतात की शरीर हेसुद्धा एकप्रकारचं इंजिनच आहे. या इंजिनाला हालचाल हवी, योग्य आहार हवा तरच ते सुरळीत काम करेल. 

Updated: Dec 3, 2022, 10:29 AM IST
Men`s Health : सायकलिंगमुळे पुरुष नपुंसक होतायत; तुम्हीही करताय का 'ही' चूक? title=
does cycling cause erectile dysfunction in men latest health news

Health Tips : असं म्हणतात की शरीर हेसुद्धा एकप्रकारचं इंजिनच आहे. या इंजिनाला हालचाल हवी, योग्य आहार हवा तरच ते सुरळीत काम करेल. शरीराला हालचाल अर्थात व्यायाम करायचं म्हटलं की आजकाल अनेकांचाच कल सायकलस्वारीकडे दिसतो. मुळात सायकलिंगचे (benefits of cycling) फायदेही तितकेच आहेत. हृदयाचं आरोग्य (heart health), स्नायूंची बळकची (Muscle) आणि शरीरातील चरबीचं (body fats) घटणारं प्रमाण असे अनेक फायदे एकट्या सायकलिंगमुळं होतात. असं असलं तरीही नुकत्याच समोर आलेल्या एका निरीक्षणातून सायकल चालवणाऱ्यांसाठी सर्वात मोठी बाब समोर आली आहे. (does cycling cause erectile dysfunction in men latest health news)

विषेष म्हणजे पुरुषांसाठी हा मोठा इशारा ठरत आहे. कारण, एकाच जागी दीर्घकाळासाठी बसून राहिल्यास त्यामुळं नपुंसकता वाढत असल्याचं आढळलं आहे. सायकलिंगच्या बाबतीतही तसंच घताना दिसत असल्यामुळं हा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

इरेक्टाइल डिस्फंक्शन म्हणजे काय? 

इरेक्टाइल डिस्फंक्शन (erectile dysfunction ) अर्थात नपुंसकता एक अशी स्थिती आहे जिथं व्यक्तीच्या शरीरात संभोगासाठी आवश्यक मर्यादेत पूरक परिस्थिती निर्माण होत नाही, झाल्यास ती परिस्थिती फार काळ टीकत नाही. वारंवार इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या उदभवल्यामुळं व्यक्तीला डिप्रेशनचाही सामना करावा लागतो. याचे थेट परिणाम आत्मविश्वास कोलमडण्यामध्ये दिसून येतात. संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार स्त्री- पुरुषांच्या संबंधांवर आणि परिणामी नात्यावर याचे परिणाम दिसून येतात. 

हेसुद्धा वाचा : पुण्यात 2 व्हायरसचा सुळसुळाट; झिकासह जॅपनीज इन्सेफेलायटीसचा रुग्ण आढळला

सायकलिंग आणि इरेक्टाइल डिस्फंक्शनचा नेमका काय संबंध? 

ज्यावेळी तुम्ही सायकल चालवण्यासाठी सायकलवर बसता तेव्हा यामध्ये तुमच्या काही अवयवांवर दबाव वाढतो, त्या अवयवांच्या नसांना होणारा रक्तपुरवठा पुरेशा प्रमाणात होत नाही आणि हे अवयव सुन्न पडू लागतात. ज्यामुळं इरेक्टाइल डिस्फंक्शनचा धोका बळावतो. ही स्थिती कोणत्याही व्यक्तीच्या आरोग्यासाठी योग्य नाही. 

संशोधनातून मोठी माहिती समोर 

पोलंडमधील व्रोकला मेडिकल यूनिवर्सिटीकडून करण्यात आलेल्या संशोधनातून हा पर्याय सुचवण्यात आला आहे की, सातत्यानं सायकलिंग करणाऱ्या पुरुषांनी इरेक्टाइल डिस्फंक्शनपासून बचाव करण्यासाठी ठराविक काळानंतर सायकलवरून उतरावं, उभं रहावं. सायकल चालवत असतानाही पॅडलवर किमान 10 मिनिटं उभं राहण्याला प्राधान्य द्यावं. सायकलला चांगली सीट असावी ही बाबसुद्धा इथं लक्षात घेतली गेली पाहिजे. 

इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या भेडसावू लागल्यास पुरुषांमध्ये नपुंसकतेचा धोका तर बळावतोच पण, त्याशिवाय मधुमेह, हृदयरोग, व्यसनं, स्थूलता, प्रोस्टेट सर्जरी, कर्करोग, नैराश्य असे आजारही भेडसावतात. 

सायकल चालवताना काय काळजी घ्यावी? 

- सायकल चालवत असताना थोड्या थोड्या वेळानं विश्रांती घ्यावी. 
- सायकलची सीट रुंद आणि मऊ असावी जेणेकरून शरीरातील नाजूक अवयवांवर यामुळं ताण येणार नाही. 
- सायकल चालवत असताना कंबर आणि पाठीला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. 
- जास्त उंच सीटवर बसणं टाळा