मुंबई : फीट आणि फाईन राहण्यासाठी पुरेशी झोप मिळणं फार गरजेचं आहे. आपल्या शरीरासाठी दररोज 7-8 तास झोप गरजेची आहे. पुरेशी झोप झाली नसेल तर संपूर्ण दिवस आळस करण्यात जातो. शिवाय अपूर्ण झोप अनेक आजारांना निमंत्रण देते.
सकाळी उठल्यानंतरही तुम्हाला थकवा जाणवत असेल तर याचं कारण तुमचं बिझी शेड्यूल असू शकतं. कामाच्या ताणावामुळे तुम्ही पुरेशी झोप घेऊ शकत नाहीत. याचा परिणाम शरीरावर होतो. जर तुम्हालाही सकाळी उठून थकवा जाणवत असेल तर आज आम्ही तुम्हाला काही खास उपाय सांगणार आहोत.
आपल्या शरीराला एका विशिष्ट वेळी झोपण्याची सवय असेल तर झोपेची वेळ बदलल्यास त्याचा परिणाम शरीरावर दिसतो. त्यामुळे योग्य वेळेवर झोपा आणि वेळेवर उठा.
झोपण्याआधी इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्सचा वापर केल्यास याचा परिणाम मेंदूवर होतो तसेच झोपेवरही होतो.
जी कामे केल्यानंतर शांत झोप मिळेल अशी कामे झोपण्याआधी जरुर करा. काहींना झोपण्याआधी पुस्तक वाचण्याची सवय असते तर काहीजण ध्यानधारणा करतात.
कॅफेन, अल्कोहोल तसेच चॉकलेट आदी पदार्थ तुमच्या झोपेत अडथळा निर्माण करु शकतात. त्यामुळे रात्रीच्या वेळेस हे पदार्थ घेणे टाळा. दिवसा तुम्ही हे खाऊ शकता.