अभ्यंगस्नानासाठी घरच्या घरी कसे बनवाल सुगंधी उटणं

फराळ, फ़टाके, कंदील,  रंगबेरंगी रांगोळ्या आणि तोरणांचा झगमगाट याबरोबर दिवाळीतील अजून एक वैशिष्ट्य म्हणजे अभ्यंगास्नान ! 

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Oct 9, 2017, 06:21 PM IST
अभ्यंगस्नानासाठी घरच्या घरी कसे बनवाल सुगंधी उटणं  title=

मुंबई : फराळ, फ़टाके, कंदील,  रंगबेरंगी रांगोळ्या आणि तोरणांचा झगमगाट याबरोबर दिवाळीतील अजून एक वैशिष्ट्य म्हणजे अभ्यंगास्नान ! 

अभ्यंगस्नानावेळेस शरीराला तेलाचा मसाज केला जातो. त्यानंतर उटण्याचा मसाज केला जातो. अनेक आयुर्वेदीक जडीबुटी आणि पावडरचा वापर करून उटणं बनवले जाते. दिवाळीच्या पहाटे गुलाबी थंडीच्या दिवसात उठून उटणं लावून आंघोळ करण्यामागे अनेक आरोग्यदायी कारणं आहेत. उटण्याने आंघोळ करण्यामागे खास आरोग्यदायी कारणं आहेत. उटण्यामुळे अनेक त्वचेच्या समस्यांपासून सुटका मिळते. 

आजकाल घाईगडबडीच्या दिवसांत अनेकजण बाजारातून विकतची उटणं घेऊन येतात. परंतू त्यात भेसळ  असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे त्वचेचे नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे यंदा बाजारातून विकतचे उटणं आणण्यापेक्षा घरीच करून पहा. पण त्यासाठी लागणारे साहित्य उत्तम आयुर्वेदिक भंडारातून विकत घ्या. 

घरच्या घरी कसे बनवाल सुगंधी उटणं  ? 

गव्हला कचरा
चंदन पावडर 
आंबेहळद
दारू हळद 
आहारातील साधी हळद
नागरमोथा
मुलतानी माती
गुलाबपावडर 
वाळा पावडर 

कृती 

तिन्ही प्रकारची हळद प्रत्येकी एक चमचा एकत्र करा. यामध्ये गव्हला कचरा,चंदन पावडर ,नागरमोथा,
मुलतानी माती, गुलाबपावडर , वाळा पावडर एकत्र करा. तुम्हांला किती सुगंधी करायची आहे यावर चंदन पावडर आणि गुलाब पावडर मिसळा. हे मिश्रण आयत्या वेळेस खोबरेल दूध आणि कोमट पाण्यामध्ये मिसळू शकता. 

टीप - पावडर अगदी बारीक असावी. रवाळ असल्यास त्याचा त्वचेला त्रास होऊ शकतो.