मुंबई : सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना नियमित ब्रश करणाऱ्यांचे दात स्वच्छ आणि मजबूत राहतात. पण अनेकजण ब्रश ओले करुन त्यानंतर दात साफ करतात. तुमची ही सवय त्रासाचे कारण बनू शकते. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळतं.
बरेचजण ब्रश ओला करुन दात घासतात तर काहीजण टूथब्रशवर पेस्ट लावल्यानंतर ते ओलं करतातं.'रिसर्चर अॅण्ड डेन्टिस्ट ल्यूक थोर्ले'नुसार दातावर पेस्ट लावण्याआधी किंवा नंतर टुथब्रश ओलं केल्यास पेस्ट पातळ होते ज्यामुळे टुथपेस्टमध्ये असलेल्या औषधीय तत्वांचा प्रभाव कमी होतो.त्यामुळे दात नीट स्वच्छ होतं नाहीत पाणी मिसळून ब्रश केल्याने फेस जास्त बतो जो दातांसाठी चांगला नसतो. कारण यामुळे टुथपेस्टमध्ये मिसळेली केमिकल आपली रिअॅक्शन दाखवू लागतात आणि हिरड्या कमजोर होतातं.
ओल्या ब्रशमुळे बॅक्टेरिया ठिक नीट निघत नाही कारण फेसमुळे दातांच्या सर्व बाजूंची स्वच्छता नीट होत नाही. यामुळे घाण दातातच राहते आणि दात हळूहळू सडू लागतात, यानंतर दातांवर पिवळे डाग पडू लागतात, असे एका डेंटीस्टने सांगितले.
ब्रश ओलं असल्यास चहा, कॉफीचे डाग दातांवरून हटत नाही. ओलं ब्रश त्याच्यावर काही ठोस प्रभाव करु शकतं नाही.कोरड्या ब्रशने दात सफेद आणि चमकदार होण्यास मदत होते.