आहारात असा वाढवा 'प्रोटीन पावडर'चा समावेश

तुम्ही जीममध्ये जात असाल किंवा विशिष्ट डाएट फॉलो करता तेव्हा तुम्हांला प्रोटीन पावडर दिली जाते. प्रामुख्याने प्रोटीन पावडर स्मुदी किंवा दूधातून घेतली जाते.

Updated: Dec 27, 2017, 09:21 PM IST
आहारात असा वाढवा 'प्रोटीन पावडर'चा समावेश  title=

मुंबई : तुम्ही जीममध्ये जात असाल किंवा विशिष्ट डाएट फॉलो करता तेव्हा तुम्हांला प्रोटीन पावडर दिली जाते. प्रामुख्याने प्रोटीन पावडर स्मुदी किंवा दूधातून घेतली जाते.

वजन घटवण्यासोबतच मसल्स बनवण्यासाठीही प्रोटीन पावडरचा वापर केला जातो. त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता निर्माण होऊ नये म्हणून आहारात अनेक प्रकारे प्रोटीन पावडरचा वापर करता येऊ शकतो.  

ओटमिलसोबत  प्रोटीन पावडर  

प्रोटीन पावडरचा आहारात समावेश वाढवायचा असेल तर ब्रेकफास्टच्या वेळेस त्याचा आहारात समावेश करा. ओटमिल  खात असाल तर स्मुदीऐवजी ओटमिल्समध्ये प्रोटीन पावडर मिसळा. यामुळे तुम्हांला दिवसभर एनर्जी टिकवायला मदत होईल.  

कॉफी किंवा हॉट चॉकलेटमध्ये मिसळा  

तुमच्या सकाळची सुरूवात हॉट चॉकलेट किंवा कॉफीसोबत होत असेल तर त्यामध्ये प्रोटीन पावडर मिसळा. यामुळे तुम्हांला आवश्यक पोषणद्रव्य मिळण्यास मदत होईल. 

आवडीनुसार आहारात समावेश 

प्रोटीन पावडर तुमच्या आवडीच्या सूप्स, करीमध्येही मिसळून खाऊ शकता. यामुळे पदार्थाची चव आणि पोषकतादेखील सुधारते. 

बेकिंग  

कप केक किंवा  ब्राऊनिज तुम्ही घरच्या घरी बनवणार असाल तर त्यामध्ये प्रोटीन पावडरचा वापर करू श्कता. बेकिंगचे पदार्थ करताना पीठातच आवश्यकतेनुसार प्रोटीन पावडर मिसळा.