केळं- जिरं - वजन घटवण्याचा घरगुती उपाय

वजन घटवणं हे तर एक आव्हानच असतं, आणि त्यातही अतिरिक्त वाढलेल्या वजनाला आटोक्यात ठेवण्यासाठी प्रयत्न करताय ?  मग तर कठीणच !

Updated: Feb 5, 2018, 04:43 PM IST
केळं- जिरं - वजन घटवण्याचा घरगुती उपाय  title=

मुंबई : वजन घटवणं हे तर एक आव्हानच असतं, आणि त्यातही अतिरिक्त वाढलेल्या वजनाला आटोक्यात ठेवण्यासाठी प्रयत्न करताय ?  मग तर कठीणच !

वजन घटवण्यासाठी केळं आणि जिरं हा घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतो. जिरं आणि केळं दोन्ही रेचक असल्याने  पचनशक्ती वाढते, अपचनाची समस्या कमी होते तसेच चयापचनाच्या  क्रियेला म्हणजेच मेटॅबॉलिझमला गती मिळते. 

आरोग्यदायी उपाय

आयुर्वेदानुसार, जिरं पोटातील फ़ॅक्ट्स कमी करतात तसेच केळं पचनमार्गाच्या आतील त्वचेला हानी पोहचवण्यापासून बचावते व  पोटातील अल्सर कमी करण्यास मद्त होते. पचनक्रियेतील या सार्‍या  प्रकिया सुरळीत झाल्यास वजन कमी होण्यास मदत होते.

कसे खाल केळं आणि जिरं

वजन कमी करण्यासाठी  पिवळ्या रंगाचे केळे निवडा. अर्ध्या केळ्याला कुसकरून त्यावर भाजलेल्या जिर्‍याची पूड टाका.  हे मिश्रण नीट मिक्स करून नियमित दोन चमचे खा. 

विशेष दक्षता

केळ – जिर्‍याचे मिश्रण काही लगेच परिणाम दाखवणार नाही. तसेच घरगुती उपाय हा वैद्यकीय औषधांना पर्याय असू शकत नाही. त्यामुळे हा उपाय करण्यापुर्वी वैद्यकीय सल्ला जरूर घ्या.