गाय आणि म्हशीच्या तूपामधील कोणतं फायदेशीर? जाणून घ्या...

कोणतं तूप फायदेशीर म्हशीचं की गाईचं? जाणून घ्या

Updated: Oct 12, 2022, 10:16 PM IST
गाय आणि म्हशीच्या तूपामधील कोणतं फायदेशीर? जाणून घ्या... title=

Ghee Benefits And Side Effects : उत्तम आरोग्यासाठी जेवणामध्ये तूपाचाही समावेश करावा. तूपाच्या सेवनाने तुम्हाला अनेक फायदे होतात. तूपाचा औषध म्हणूनही उपयोग केला जातो. मात्र कोणतं तूप फायदेशीर असतं, म्हशीचं की गाईचं?, याबाबत जाणून घ्या. मात्र बाजारातील भेसळयुक्त तुपापासून सावध रहा. (cow ghee vs buffalo ghee which one is better of health ghee benefits health marathi news)

गाईचे तूप पिवळे असतं. गाईच्या तूपामध्ये म्हशीच्या तुपापेक्षा खनिजे, अँटी-ऑक्सिडंट्स आणि प्रथिनेंसोबतच अधिक पोषक तत्त्वे आढळतात, असं आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. कॅल्शियम आणि जीवनसत्त्वांबद्दल बोलायचे झालं तर ते गाय आणि म्हैस या दोन्हींच्या तूपात पुरेशा प्रमाणात आढळते. शरीरात फॉस्फरस आणि मॅग्नेशियमची कमतरता असल्यास म्हशीचे तूप चांगले आहे.

घरातील एखाद्या व्यक्तीला पचनाशी संबंधित समस्या येत असतील तर त्यांच्यासाठी गाईचे तूप चांगले मानलं जातं कारण म्हशीचे तूप पचायला थोडं कठीण असते. गाईच्या तूपात विद्राव्य आम्ल असते, त्यामुळे ते लहान मुले आणि वृद्धांसाठी अधिक फायदेशीर ठरते.

जर तुम्हाला वजन संतुलित ठेवायचं असेल गायीचे तूप तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर म्हशीचे तूप तुमच्यासाठी चांगले आहे, पण तूप खाताना हे लक्षात ठेवा की ठराविक प्रमाणातच वापरावे. जास्त प्रमाणात तूप तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. 

म्हशीच्या तूपात फॅट जास्त प्रमाणात आढळते आणि जे जास्त शारीरिक श्रम करतात त्यांच्यासाठी ते चांगले मानले जाते. शेल्फ लाइफ म्हशीच्या तुपात जास्त प्रमाणात आढळते. त्याच वेळी, शेल्फ लाइफ गायीच्या तुपात कमी प्रमाणात आढळते.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)