मुंबई : जर एखाद्या पुरूषाला कोरोना व्हायरसचं संक्रमण झालं तर त्याला इरेक्टाइल डिसफंक्शन (Erectile Dysfunction) म्हणजे नपुंसकतेचा धोका तीन पटीने वाढतो. रोम विद्यापीठातील डॉक्टरांनी 100 पुरूषांच्या फर्टिलिटीची तपासणी केली आहे. यामधील 28 टक्के पुरूषांमध्ये इरेक्टाइल डिसफंक्शन म्हणजे नपुंसकतेचा दोष असल्याची माहिती मिळाली. सामान्य स्तरावर 9 टक्के लोकांमध्ये ही समस्या पाहायला मिळाली आहे. मात्र यांना कोरोनाची लागण झाली नव्हती.
रोम विद्यापीठातील डॉक्टरांनी 100 लोकांची चाचणी केली. यामधील अनेकांची वयमर्यादा 33 इतकी होती. यामधील 28 पुरूषांमध्ये नपुंसकतेचा दोष आढळला. महत्वाचं म्हणजे यांना कोरोनाची लागण झाली नव्हती. यातील 9 टक्के लोकांमध्येच ही समस्या होती. म्हणजे सामान्य पुरूषांच्या तुलनेत कोरोना संक्रमित पुरूषांमध्ये इरेक्टाइल डिसफंक्शनचा त्रास तीन पटीने जास्त आहे. हे स्टडी एंड्रोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित केलं आहे.
Men who contract Covid-19 have THREE TIMES the risk of erectile dysfunction, study says https://t.co/9DdnYWH3ZU
— Daily Mail Online (@MailOnline) March 30, 2021
संशोधकांचं म्हणणं आहे की,'कोरोना व्हायरस एंडोथेलियम (Endothelium) मध्ये सूज निर्माण करते. रक्त पेशीतील आतल्या बाजूस ही सूज येते. संपूर्ण शरीरात रक्त पेशी असतात. यामुळे पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्त पेशी लहान आणि पातळ असतात. यामुळे जर सूज आल्यास याला होणारा रक्तपुरवठा थांबतो. याचा परिणाम सेक्सुअल बिहेविअरवर होताना दिसतो.'
कोरोनाबाधित पुरूषांबाबत हा नवा रिसर्च करण्यात आळा आहे. कोरोना व्हायरसच्या संक्रमणाच्या चुकीचा परिणाम महिलांच्या तुलनेत पुरूषांवर पडला आहे. महिलांच्या तुलनेत कोरोना व्हायरसमुळे 1.7 पटीने अधिक पुरूषांचा मृत्यू झाला आहे. तसेच पुरूषांना अनेक गंभीर आजार झाल्याचे देखील समोर आले आहे.