नवी दिल्ली : भारतातील सुमारे ५६% कॉरपोरेट कर्मचारी दिवसातील ६ तासांहुन कमी झोप घेतात. कारण कामावरील ताणामुळे त्यांच्या शरीर-मनावर ताण निर्माण होतो. त्याचा परिणाम नक्कीच झोपेवर होतो. परिणामी कामाबद्दलची उत्पादकता कमी होते.
कामाचा ताण, सहकार्यऱ्यांचा ताण, बॉसचे दडपण या सगळ्यामुळे कर्मचाऱ्यांवर शारीरिक-मानसिक ताण येतो. परिणामी स्वास्थ्य बिघडते आणि सुट्ट्या घेतल्या जातात. व्ययक्तिक आयुष्यातील भांडणे, ऑफिसमधले राजकारण आणि कामाचा ताण यामुळे कर्मचाऱ्यांवरील ताण वाढू लागतो.
रिपोर्टनुसार, मेटाबॉलिक सिंड्रोमची समस्या वाढीस लागली आहे. ज्यात मधुमेह, युरिक अॅसिड उच्च प्रमाण, उच्च रक्तदाब, स्थुलता, कोलेस्ट्रॉलचे उच्च प्रमाण या आजारांचा समावेश आहे. रिपोर्टनुसार, सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी १६% लोक स्थुलतेचे बळी आहेत. तर ११% लोक गॅंगरिंगने त्रासलेले आहेत. रिपोर्टनुसार, उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांनी त्रासलेल्या लोकांचे प्रमाण अनुक्रमे ९ आणि ८ टक्के आहे.
रिपोर्टनुसार, स्पॉडिलोसिस ५%, हृद्यविकार ४ %, अस्थमा २.५ %, स्लिप डिस्क २% आणि आर्थरायडिस १% या आजारांनी कॉरपोरेट कर्मचारी त्रस्त आहेत. त्याचबरोबर थकवा, निद्रानाश यांसारख्या आजारांचे धोका वाढत आहे. या सर्व आजारांमुळे उत्पादकतेवर मोठा परिणाम होऊ लागतो.