...तर तुम्हालाही मिळू शकतो 90 दिवसांत बूस्टर डोस

सरकारने कोरोनाचा दुसरा आणि बूस्टर डोसमधील फरक केवळ 90 दिवसांवर आणला आहे. 

Updated: May 18, 2022, 10:29 AM IST
...तर तुम्हालाही मिळू शकतो 90 दिवसांत बूस्टर डोस title=

मुंबई : मुंबईतील कोरोनाच्या बूस्टर डोसबाबत बीएमसीने नवीन आदेश जारी केले आहेत. आता परदेशात जाणाऱ्यांना 9 महिन्यांऐवजी 90 दिवसांनीच बुस्टर डोस घेता येणार आहे. केंद्र सरकारने दोनच दिवसांपूर्वी यासंदर्भातील मंजुरी दिली आहे.

केंद्र सरकारने कोरोनाच्या बूस्टर डोसबाबत परदेशात प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा दिलाय. सरकारने कोरोनाचा दुसरा आणि बूस्टर डोसमधील फरक केवळ 90 दिवसांवर आणला आहे. यानुसार आता पहिल्या 9 महिन्यांनंतर, बूस्टर डोस दिला जाऊ शकतो. आता सरकारने परदेशात जाणाऱ्यांना केवळ 90 मध्ये बुस्टर डोस मिळण्याची सुविधा दिलीये.

यासंदर्भात सरकारची मंजुरी मिळताच बीएमसीने व्यवस्था लागू केली. यावेळी बीएमसीकडून, बूस्टर डोसच्या वेळेत बदल केल्यामुळे कोविन अॅपमध्येही बदल करण्यात आल्याचंही सांगण्यात आलंय. बीएमसीच्या अखत्यारितील सर्व खाजगी आणि सरकारी लसीकरण केंद्रांना आदेश जारी करण्यात आलेत.

यावेळ ज्याला परदेशी प्रवास करायचा आहे त्याने व्हिसा, विमान तिकीट, नोकरीचं पत्र, अभ्यासाची पात्रता किंवा परदेशी जाण्याचं खरं कारण यांसारख्या पुरावे द्यावे लागणार आहे. ही सर्व कागदपत्रं लसीकरण करण्यापूर्वी जिल्हा लसीकरण कार्यालयात न्यावी लागतील. याच ठिकाणी ही कागदपत्र तपासली जातील.