Corona Update : कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर सर्व व्यवहार सुरू झालेत. महाराष्ट्रासह काही राज्यांनी मास्कची सक्तीही बंद केलीये. मात्र कोरोना अद्याप संपलेला नाही, हे गेल्या काही दिवसांतल्या आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे.
मुंबईत गेल्या 10 दिवसांत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 35 टक्क्यांनी वाढलीये. मंगळवारी मुंबईत 122 रुग्ण आढळून आलेत. त्यातील दोघांना रुग्णालयात दाखल करावं लागलंय. गेल्या 24 तासांत एकही मृत्यूची नोंद नाही, ही समाधानाची बाब असली तरी अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढल्यानं काळजी घेणं आवश्यक आहे.
दुसरीकडे देशातही काहीशी चिंताजनक आकडेवारी समोर येतेय. गेल्या 24 तासांत देशात 2 हजार 897 नवे रुग्ण आढळून आलेत. तर 54 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून 19 हजार 494वर जाऊन पोहोचलीये. मंगळवारीही 2 हजार 288 रुग्ण आढळून आले होते.
एक समाधानाची बाब म्हणजे मुंबई, दिल्लीसह देशभरात सापडलेल्या आलेले रुग्ण एकतर असिम्प्टमॅटिक आहेत किंवा फारच सौम्य लक्षणं आढळून आली आहेत. त्यामुळे रुग्णालयात दाखल होणा-या रुग्णांची संख्या फारच नगण्य आहे. असं असलं तरी बेसावध राहून चालणार नाही. सतर्क राहा. कोरोनाला पुन्हा डोकं वर काढू देऊ नका.