Sleep And Age : तुमची झोप पूर्ण होत नाही का? जाणून घ्या काय होतात परिणाम

Sleep According To Age : शारीरिक आणि मानसिक विकासासाठी झोप महत्त्वाची आहे. वयानुसार व्यक्तीसाठी किती तास झोप महत्त्वाची आहे. याबद्दल जाणून घ्या.

Updated: Nov 21, 2022, 03:56 PM IST
Sleep And Age : तुमची झोप पूर्ण होत नाही का? जाणून घ्या काय होतात परिणाम title=

Relation Between Sleeping Hours And Age: निरोगी आरोग्यासाठी प्रत्येक व्यक्तीला पुरेशी झोप मिळणे गरजेचे असते. तर दुसरीकडे लहान मुलांना तुम्ही बराच वेळ झोपताना पाहिलं असेल तर मोठ्या, वृद्ध व्यक्ती बराच काळ जाग्या असतात.  कारण  झोपताना मुलांच्या मेंदूचा विकास होत असतो. यामुळे प्रौढांपेक्षा जास्त लहान मुलांना झोपचे आवश्यकता असते. म्हणूनच लहान मुले प्रौढांपेक्षा जास्त झोपतात. त्यानंतर जसजसे वय वाढत जाते तसतसे झोपेचे तास कमी होत जातात. मात्र 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक व्यक्तीला 7 ते 8 तासांची झोप गरजेची असते.

जर तुम्ही पुरेशी झोप घेत असाल तर तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या (physically and mentally fit) तंदुरुस्त रहाल. गरजेपेक्षा कमी झोप घेणे तुमच्या आरोग्याचे (health problems) नुकसान करू शकते. मग झोपेचं योग्य गणित काय आहे ? आज याबद्दल माहिती जाणून घेऊया. हेही जाणून घेऊया की कोणत्या वयात किती तास झोपेची गरज असते.  

झोपेची गरज आणि त्याचे फायदे

  • वयानुसार पुरेशी झोप घेतल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते, मेंदू सुरळीत काम करतो, हृदय निरोगी राहते आणि किडनी, यकृताच्या समस्याही दूर राहतात.
  • झोपेमुळे मानसिक तणाव दूर होऊन मन शांत होण्यास मदत होते. यामुळे तुमचा मेंदू जीवनातील समस्या सोडवण्यासाठी आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी तयार होतो.
  • केवळ झोपेचे तासच नाही तर झोपेची गुणवत्ताही महत्त्वाची आहे. तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य झोपेच्या गुणवत्तेवर अवलंबून असते.
  • शरीर शांत होण्यासाठी, स्नायूंचा ताण दूर करण्यासाठी आणि पेशींची दुरुस्ती करण्यासाठी झोप आवश्यक आहे.
  • कार्यक्षमता आणि भावनिक शक्ती वाढवण्यासाठी चांगली आणि गाढ झोप आवश्यक आहे.
  • शिकण्याची क्षमता वाढवण्यासाठी मन शांत ठेवणं आवश्यक आहे आणि त्यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे.

वाचा : रोज 1 ग्लास बिअर प्या, मेमरी शार्प होण्याबरोबरच मिळतील 'हे' फायदे

कोणत्या वयात तुम्ही किती तास झोपावे?

नवजात मुलांसाठी

1 ते 4 आठवड्यांच्या बाळाला दिवसातून 15 ते 17 तासांची झोप
1 ते 4 महिन्यांच्या बाळाला 14 ते 15 तासांची झोप
4 महिने ते 12 महिन्यांच्या बाळाला 13 ते 14 तासांची झोप

एक वर्षाहून अधिक

1 ते 3 वर्षांच्या मुलास 12 ते 13 तासांची झोप
3 ते 6 वर्षांच्या मुलासाठी 10 ते 12 तासांची झोप 
6 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटासाठी

6 ते 12 वर्षांच्या मुलाने दररोज सुमारे 9 ते 10 तास झोप
12 ते 18 वयोगटातील मुलांनी दररोज 8 ते 10 तासांची झोप
18 वर्षांवरील सर्व लोकांनी दररोज 7 ते 8 तास झोप