Side effects of Brinjal : अनेकांना वांगे आवडतं नाही. असं अनेक जण आहेत जे वांग्याचे वेगवेगळे पदार्थ चवीने खातात. मसाले वांगे, वांगे बटाटा रस्सा, वांग्याचं भरीत अगदी वांग्याचे काप...महाराष्ट्रात हिरवी वांगी, काटेरी वांगी आणि छोटी जांबळी मसाला वांगी मिळतात. चुलवरील भाजीला तर अस्सल चव असते...आपण बोटं चोखत राहतो. नुसतं चव नाही पण वांगी खाण्याचे अनेक फायदे आहेत. या भाज्यांमध्ये इतर भाज्यांपेक्षा जास्त गुणधर्म आहेत. वांग्याचे सेवन केल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. याच्या सेवनाने वजनही कमी करता येते. पण एवढे गुण असूनही काही लोकांसाठी ही भाजी नुकसानदायक ठरते. पण तुम्हाला माहित आहे का की असे अनेक लोक आहेत ज्यांनी वांग्याचे सेवन टाळावे? होय, तुम्ही काही समस्यांना बळी पडता तेव्हा वांगी तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतात. अशा परिस्थितीत कोणी वांग्याचं सेवन करु नये ते पाहूयात. (brinjal benefits and side effects piles Eye irritation Blood deficiency depression Allergies and Weak digestive system in marathi)
ज्या लोकांना पोटाशी संबंधीत आजार असतील शिवाय ज्यांची पचनक्रिया कमोजर असेल त्यांनी वांग्याचं सेवन करु नये. अशा लोकांना गॅसचा त्रास होऊ शकतो. अजून अनेक समस्या होऊ शकतात.
जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची ऍलर्जी असेल तर वांग्यापासून दूरच राहा. कारण अशात ती ऍलर्जी तुमच्या संपूर्ण शरीरात पसरू शकते. त्यामुळे अशा लोकांनी वांग्याचं सेवन करू नये.
जर तुम्ही डिप्रेशनसाठी औषध घेत असाल किंवा नैराश्याने त्रस्त असाल तर तुम्ही वांग्याचं सेवन टाळावे. कारण तुमच्या शरीरावरील औषधाचा प्रभाव कमी होतो.
तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तरीही तुम्ही वांग्याचे सेवन टाळावे. कारण याच्या सेवनाने रक्त वाढण्यास अडथळा निर्माण होतो.
ज्या लोकांच्या डोळ्यांमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या आहे किंवा तुम्हाला जळजळ किंवा सूज आल्याने त्रास होत असेल तर तुम्ही वांग्याचे सेवन करू नये. कारण यामुळे तुमची समस्या आणखी वाढू शकते.
जर तुम्हाला मूळव्याधचा त्रास असेल तर वांग्यापासून दूर राहा. अन्यथा तुमची समस्या आणखी वाढेल.
तुम्हाला स्टोनचा त्रास असलेल तर वांग्याचं सेवन अजिबात करू नका. वांग्यामध्ये आढळणारे ऑक्सलेटमुळे स्टोनची समस्या अधिक वाढू शकते.
(हा लेख सामान्य माहितीसाठी आहे, कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे)