Relationships : लग्नासाठीच्या वयात आल्यानंतर कुटुंबीयांची एकच भुणभूण सुरु होते आणि पाहता पाहता स्थळं बघण्यालाही सुरुवात होते. Love Marriage करणाऱ्यांना या गोष्टींचं दडपण नसतं. पण, विवाह प्रस्ताव स्वीकारत, वधु वर सूचक किंवा एखाद्या ओळखीतल्यांनी सुचवलेल्या स्थळाशी अर्थात व्यक्तीशी लग्न करणं मात्र फार कठीण आणि तितकंच आव्हानात्मक ठरतं. (Before doing Arranged Marriage think about these 5 things otherwise regret is inevitable)
Arranged Marriage विवाहपद्धतीमध्ये अनेकदा काही अशी वळणं येतात जेव्हा आपण लग्न केलंय तर खरं पण हा निर्णय योग्य होता का? असा अतिशय गंभीर प्रश्न उभा राहतो. त्यामुळं Arranged Marriage करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेणं आणि त्यांचा पूर्ण विचार करणं कधीही उत्तम पर्याय.
'परफेक्ट मॅच' (Perfect Match) म्हणून तुम्ही ज्या व्यक्तीचा विचार करत आहात त्याआधी तुम्ही नात्यातून काय अपेक्षा ठेवता याचा पूर्ण करा. तुम्हाला तुमच्या नात्यात काय हवं हे माहित असणे खूप गरजेचे आहे. जर ते माहित नसेल तर कदाचित तुमचा Arranged Marriage गोंधळ होऊ शकतो. हाच गोंधळ टाळण्यासाठी काही गोष्टी नक्की ध्यानात ठेवा.
1. वेळमर्यादा ठरवा (Set A Timeline)
अरेंज मॅरेज करताना तुम्ही स्वत:साठी एक वेळ निश्चित केल्याने तुम्हाला पुढील गोष्टींसाठी स्पष्टता मिळते. तुम्ही तुमच्या पार्टनरची निवड मॅट्रीमोनिअल साईट वरुन किंवा नातेवाईकांनी केली असल्यास त्या व्यक्तीसोबत किती वेळ घालवावा याचे गणित तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे. अशा वेळेस तुमची घाई होत नाही आणि लग्नाआधी त्या व्यक्तीसोबत घालवण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. जमल्यास या वेळेत तुम्ही एकमेकांना वेळ द्या, आवडी-निवडी, सवयी आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी आपाआपसात शेअर करा. हा पहिला टप्पा अरेंज मॅरेज करणाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो.
2. त्याच्या किंवा तिच्या कुटुंबासमवेत वेळ व्यतीत करा (Spend Time With Her or His Family)
ज्या व्यक्तीसोबत तुम्ही लग्न करणार आहात त्या व्यक्तीच्या कुटुंबासोबत काही महत्त्वाचे क्षण घालवा. अशाने त्याच्या घरातील परंपरा रिती, प्रथा परंपरा याविषयी माहित मिळते. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने तुम्हाला त्यांच्या आवडीनिवडींची कल्पना येते. पुढे तुम्हाला त्या परिवारतील मंडळीना समजणे फार कठीण जात नाही.
3. आर्थिक समतोल ( Financial Compatibility)
लग्नानंतर दोघांनी कमवते असणे फार महत्त्वाचे आहे. जर तुम्ही दोघेही नोकरी करताय, किंवा अर्थार्जनाचे दोन मार्ग आहेत तर, अशा वेळी कोणा एकावर भार येत नाही. तुम्ही अरेंज मॅरेज करा किंवा लव्ह मॅरेज आर्थिक स्वांतत्र्य असणे फार गरजेचे आहे. तुम्ही समोरच्या व्यक्तीवर अवलंबून राहिल्यास त्याचा तुम्हाला भविष्यात त्रास जाणवेल. त्यामुळे अरेंज मॅरेज करण्याआधी आर्थिक गणिते न लाजता स्पष्टपणे बोलून घ्या.
4. मनात काही ठेवू नका... (Lay All Your Cards On The Table)
तुम्ही जेव्हा रिलेशनमध्ये असता तेव्हा तुम्हाला तुमच्या प्रियकराविषयी सगळ्याच गोष्टी माहित असतात, पण जेव्हा तुम्ही Arranged Marriage करता तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीविषयी काहीच माहित नसते. मग अशा वेळेस तुम्ही त्या व्यक्तीचा तुमच्या आयुष्यात कशाप्रकारे विचार करता, तुम्हाला काय अपेक्षित आहे या सगळ्या गोष्टी न विचार करता त्या व्यक्तीला सांगा जेणेकरुन विवाहबधंनात अडकण्याआधी तुम्हाला चांगलीच स्पष्टता मिळते.
5. भूतकाळाविषयी जोडीदाराला कल्पना असूद्या (Be Open About Your Past)
आपण अनेकदा लग्नाच्या वेळी समोरील व्यक्तीपासून भूतकाळ लपवतो. पण काही वेळाने तो भूतकाळ काही कारणाने समोर आल्याने नवीन वादाला आणि गैरसमजांना तोंड फुटतं. अशावेळेस शक्य तितक्या किंवा गरजेचे काही भूतकाळातील अनुभव तुमच्या होणाऱ्या पार्टनरला सांगावेत. जेणेकरुन काही गोष्टींचा अंदाज घेणे सोपे होते. अशाने तुमचे नाते अधिक मजबूत व्हायला मदत होते.
या 5 गोष्टींमुळे तुम्हाला अरेंज मॅरेज करताना फारशा अडचणी येत नाही. लग्नासाठी होकार देण्याआधी या 5 गोष्टींचा विचार केल्यास तुम्हाला महत्त्वाच्या स्पष्टता मिळतात.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)