सावधान ! ऑफिसमध्ये जास्तवेळ थांबताय ? हा होईल त्रास

यातून बाहेर पडायचे असल्यास विश्रांतीचे तास घेणं गरजेचे आहे.

Updated: Aug 13, 2018, 08:29 AM IST
सावधान ! ऑफिसमध्ये जास्तवेळ थांबताय ? हा होईल त्रास title=

नवी दिल्ली : तुम्ही काळवेळ न पाहता स्वत:ला कामात गुंतवून घेताय? वेळी-अवेळी, खाण्या-पिण्याकडे दुर्लक्ष करुन कामालाच प्राधान्य देताय ? तर जरा थांबा. हे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा परिणाम केवळ तुमच्या शरिरावरच नाही तर कौटुंबिक स्वास्थ्यावरही होऊ शकतो. एका नव्या संशोधनात याचा खुलासा झालायं.

जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष  

कामाच्या वेळा संपल्यानंतरही बॉसला कर्मचाऱ्यांकडून काम करण्याची अपेक्षा असते. या अपेक्षा पूर्ण करण्यााठी कर्मचारी नातेवाईक संबध बाजूला ठेवून कामाला प्राधान्य देतात. ऑफिसच्या कामाकडे लक्ष देण्यासाठी कर्मचारी घरातील जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करतात.

संशोधन  

अमेरिकेतील पेंसिलवेनियामधील लेहघ विश्वविद्यालयात यासंदर्भातील रिसर्च करण्यात आला. वाढीव अपेक्षा या नेहमी घातक असतात. यामुळे केवळ कर्मचाऱ्यांची चिंता वाढत जाते. यामुळे त्यांचे नातेसंबंध आणि स्वास्थावर वाईट परिणाम होतो. त्यांच्या वैवाहिक आयुष्यावरही याचा नकारात्मक परिणाम होतो.

यातून बाहेर पडायचे असल्यास विश्रांतीचे तास घेणं गरजेचे आहे. हे संशोधन शिकागोतील अॅकेडमी ऑफ मॅनेजमेंटच्या वार्षिक बैठकीत सादर केलं गेलं.