Health news: पावसाळ्यात या 5 गोष्टींचं सेवन करणं टाळाच...

 पावसाळ्याच्या दिवसात आजार मोठ्या प्रमाणावर पसरतात. 

Updated: Jul 10, 2021, 12:01 PM IST
Health news: पावसाळ्यात या 5 गोष्टींचं सेवन करणं टाळाच... title=

मुंबई : पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे. पावसाळ्याच्या दिवसात आजार मोठ्या प्रमाणावर पसरतात. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. या हंगामात आपल्याला आहाराचीही विशेष काळजी घ्यावी लागते. जर थोडेसं दुर्लक्ष केलं तर आरोग्यास हानी पोहोचू शकते. आहारतज्ज्ञ डॉ. रंजना सिंह यांच्या मते, असे काही पदार्थ पावसाळ्यात आपल्याला खाऊ नयेत. 

डाएट तज्ज्ञ डॉ. रंजना सिंह म्हणतात की, 'विशेषत: पावसाळ्याच्या दिवसात लोकांनी स्ट्रीट फू़ड जसं की, पाणीपुरी अशा पदार्थांचं सेवन करू नये. पाणीपुरीमध्ये वापरलं जाणारं पाणी योग्य असेल का हे आपल्याला माहिती नसतं. दूषित पाण्यामुळे अनेक प्रकारचे संसर्ग होण्याचा धोका असतो.

पावसाळ्यात कोणत्या पदार्थांचं सेवन करणं टाळाल

तळलेले पदार्थ

जास्त आर्द्रता हवामानात आपली पचनसंस्था मंद होते. पकोडे, समोसे, कचौरी यामुळे गॅस संबंधित समस्या उद्भवतात. त्यामुळे पावसाळ्यात या पदार्थांपासून दूर राहणं चांगलं.

पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्या तरी पावसाळ्याच्या दिवसात त्या खाणं टाळल्या पाहिजेत. डॉ. रंजना सिंह म्हणतात की, पावसाळ्याच्या दिवसात त्यामध्ये घाण असण्याची शक्यता असते. त्यामुळे यात जंतू होण्याची शक्यता असते. पावसाळ्यात पालक, कोबी, फुलकोबी या भाज्या अजिबात खाऊ नका. 

कापून ठेवलेली फळं

रस्त्याच्या बाजूला मिळणारी फळं बऱ्याच काळापासून कापून ठेवलेली असतात. पावसाळ्याच्या दिवसांत जंतू त्यांच्यावर चिकटून राहतात जे आरोग्यास हानी पोहोचवतात.

गॅसयुक्त ड्रिंक्स

डॉ. रंजना सिंह म्हणतात की, गॅसयुक्त पेयं आपल्या शरीरातील मिनरल्स कमी करतात. या दिवसांत शक्य तितकं पाणी अधिक प्यावं. तुम्ही लिंबू पाणीही पिऊ शकता. 

सी फूड

पावसाळ्यात सी फूड खाणं टाळावं. मांसाहार करण्याची इच्छा झाल्यास तुम्ही चिकन किंवा मटण खाऊ शकता. मुख्य म्हणजे पाव केवळ ताजे अन्न खा आणि हे अत्यंत चांगलं शिजवले गेले आहे