तुम्हीही आहात Overthinking चे शिकार? हे उपाय नक्कीच उपयोगी ठरतील

चला तर जाणून घेऊया महिला कोणत्या मार्गांनी अतिविचार करण्याची सवय दूर करू शकतात.

Updated: Oct 9, 2022, 03:48 PM IST
तुम्हीही आहात Overthinking चे शिकार? हे उपाय नक्कीच उपयोगी ठरतील title=
Are you also a victim of overthinking These solutions will definitely be useful nz

Tips to stop overthinking: जीवनात कोणतीही गोष्ट विचारपूर्वक करण्यायाठी आपल्याला अनेकजण सल्ला देतात. विचार करुन एखादे काम केल्यास तुम्हाला त्या कामात चांगलेच यश मिळते. असे केल्याने चूक होण्याची शक्यता कमी असते, परंतु जर जास्त विचार केला तर काम बिघडू ही शकते. खरं तर, काही लोकांना जास्त विचार करण्याची सवय असते. ते प्रत्येक गोष्टीबद्दल इतका विचार करतात की ते स्वतः अस्वस्थ होऊ लागतात. (Are you also a victim of overthinking These solutions will definitely be useful nz)

कामाचा ताण, वैयक्तिक समस्या, घरगुती वाद किंवा इतर अनेक कारणांमुळे अनेक महिला अधिक विचार करू लागतात आणि तणावाखाली राहतात. तुम्हाला माहितेय का, सतत चिंता केल्याने किंवा जास्त विचार केल्याने अनेकदा मानसिक आरोग्य बिघडू शकते. अशा परिस्थितीत अधिक विचार करण्याची सवय कमी करून ताण कमी करता येतो. चला तर जाणून घेऊया महिला कोणत्या मार्गांनी अतिविचार करण्याची सवय दूर करू शकतात.

अतिविचार करण्याच्या सवयीवर नियंत्रण कसे ठेवावे

1. स्वतःला विचलित करा
तुम्हाला ज्या गोष्टी करायला आवडतात आणि ज्यात तुम्हाला रस आहे ते तुम्ही करू शकता.  पाककृती, नृत्य, चित्रकला किंवा पुस्तके वाचणे यासारखे काहीही असू शकते.

2. एक दीर्घ श्वास घ्या
जेव्हा तुम्हाला अस्वस्थ किंवा तणाव वाटत असेल तेव्हा दीर्घ श्वास घेणे सुरू करा.

आणखी वाचा - Dark Upper Lips: ओठांवरील काळे डाग नको असल्यास करा 'हे' घरगुती उपाय

3. ध्यान करणे
तुम्ही नियमितपणे ध्यानाला तुमच्या सवयीचा भाग बनवू शकता. यामुळे तुमचे मानसिक आरोग्य सुधारेल.

4. नकारात्मक विचार ओळखा
स्वयंचलित नकारात्मक विचार (ANTs) ओळखून तुमचे विचार नोंदवा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. जेव्हा कधी वाईट विचार मनात येतो तेव्हा स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःला सांगा की तुम्ही चांगले करत आहात.

5. यशाची स्तुती करा
तुम्ही आतापर्यंत जे काही साध्य केले आहे ते एका वहीत लिहा आणि स्वतःची प्रशंसा करा.

आणखी वाचा - Laptop पावसात भिजला... नुसतंच टेन्शन घेण्याऐवजी हे वाचा

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)