मुंबई : मासिक पाळी दरम्यान क्रॅम्स टाळण्यासाठी तुम्ही हीटिंग पॅड किंवा गरम पाण्याची पिशवी वापरता का? बरं, या क्रॅम्प्सचा त्रास हा मासिक पाळीदरम्यान होणारच आहे. अनेक महिला हा त्रास कमी व्हावा म्हणून पेनकिलर्सही घेतात. मात्र तुम्ही कधी कोरफडीचा रस प्यायलात का? यासाठी पेनकिलर औषधांचा वापर करण्यापेक्षा कोरफडीचा रस तुम्हाला पीरियड्स क्रॅम्प्समध्ये आराम देऊ शकतो.
तुम्ही कोणत्याही परिस्थितीत एलोवेरा ज्यूस पिऊ शकता. कोरफडीचा रस तुम्हाला आतून निरोगी तर ठेवतोच शिवाय मासिक पाळीतही आराम देतो. जाणून घेऊया मासिक पाळीच्या काळात एलोवेरा ज्यूस पिण्याचे फायदे.
एलोवेरा ज्यूस पीरियड क्रॅम्प्सपासून तातडीने आराम देण्यास मदत करतो. कोरफडीच्या रसात एक चमचा मध मिसळून ते दिवसातून किमान दोन ते तीन वेळा प्यायल्यास हेवी फ्लो कमी होण्यास मदत होते.
तुमची मासिक पाळी नियमित करण्यासाठी आणि स्थूलपणा कमी करण्यासाठी एलोवेरा ज्यूस हा एक चांगला पर्याय आहे. कोरफड हार्मोनल असंतुलन सुधारण्यास आणि मासिक पाळीच्या अनियमिततेवर उपचार करण्यास मदत करतं.
मासिक पाळीच्या दिवसांत अनेकदा महिलांना बद्धकोष्ठता तसंच गॅसची समस्या वाढू शकते. अशा परिस्थितीत एलोवेरा ज्यूस देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.