नवी दिल्ली : फळे भाज्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात. पण कोणत्या फळाचे नेमके काय फायदे आहेत, हे ठाऊक नसल्याने त्याचा योग्य वेळी फायदा घेता येत नाही. शरीराबरोबच मनाचे आरोग्य राखण्यास मदत करणाऱी द्राक्षे अनेकांना आवडतात. हिरव्या आणि काळ्या रंगात मिळणाऱ्या या फळाचे फायदे जाणून घेऊया...
आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत मायग्रेनची समस्या अत्यंत सामान्य आहे. अशावेळी द्राक्षांचा रस पिणे फायदेशीर ठरेल. नियमित रस घेण्याने मायग्रेनच्या त्रासावर नक्कीच फायदा होईल.
उच्च रक्तदाबावर द्राक्ष खाणे रामबाण ठरेल. द्राक्षाने रक्तदाब नियंत्रित राहतो. उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी आठवड्यातून तीन-चार वेळा द्राक्षाचे सेवन करा त्याचा नक्कीच फायदा होईल.
द्राक्षात ग्लूकोज, मॅग्नेशियम आणि सायट्रिक अॅसिड यांसारखे पोषकघटक असतात. त्यामुळे अनेक आजारांवर द्राक्ष खाणे लाभदायी ठरते. टीबी, कॅन्सर आणि ब्लड इंफेक्शन यांसारख्या आजारावर याचा विशेष फायदा होतो.
जगभरात सर्वात जास्त मृत्यू हृदयविकारांमुळे आणि त्यासंबंधित इतर आजारांमुळे होतात. यासाठी द्राक्ष खाणे विशेष फायद्याचे ठरेल. अलीकडेच झालेल्या संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, ब्रेस्ट कॅन्सरवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून द्राक्ष खाणे अत्यंत फायद्याचे ठरेल.
द्राक्षाच्या सेवनाने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर यात लोहाचे अधिक प्रमाणात असल्याने लोहाचा एक उत्तम स्त्रोत आहे.
भूक लागत नसल्यास द्राक्षाचा रस पिणे फायदेशीर ठरेल. त्याचबरोबर त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होईल.
शरीरात रक्त कमी असल्यास एक ग्लास द्राक्षाच्या रसात २ चमचे मध घालून प्या. त्यामुळे अॅनेमिया दूर होण्यास मदत होईल. तसंच त्यामुळे येणारा थकवा कमी होऊन तरतरी येईल.