Emotionally Manipulated : तुमच्या नात्यात manipulate सारख्या समस्या आहेत का?

तुमच्यासोबत ही असे होते का? जर होत असल्यास ते नेमके कोणते गुण आहेत ज्यामुळे ती व्यक्ती तुम्हाला manipulate करत असते...

Updated: Oct 3, 2022, 08:43 PM IST
Emotionally Manipulated : तुमच्या नात्यात manipulate सारख्या समस्या आहेत का? title=
6 Ways To Know You Are Being Emotionally Manipulated By Your Partner nz

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !

Emotionally Manipulated  : या कवितेच्या ओळी सगळ्याना माहितच असतील. काहींना प्रेमात चांगले अनुभव येतात तर काहींचा अनुभव हा वाईट असतो. जेव्हा आपण कोणा व्यक्तीवर प्रेम करत असतो तेव्हा त्या नात्यात भावनिक गुंतवणूक करत असतो. प्रेम आपल्याला सगळं काही शिकवते. अनेकदा जोडप्यांमध्ये मतभेद पाहायला मिळतात. (6 Ways To Know You Are Being Emotionally Manipulated By Your Partner nz)

नातं टिकावं यासाठी नात्यातली एक व्यक्ती नेहमीच सहन करणारी असते. समोरील व्यक्ती ही अनेकदा टॉर्चर करणारी पाहायला मिळते. तर तुमच्यासोबत ही असे होते का? जर होत असल्यास ते नेमके कोणते गुण आहेत ज्यामुळे ती व्यक्ती तुम्हाला manipulate करत असते...

1. तुम्ही जर योग्य आहात तर तुम्हाला समोरील व्यक्तीचे ऐकण्याची गरज नाही.

2. तुम्ही स्वत:ला कमजोर समजू नका. स्वत:ला महत्त्व द्या. स्वत:ला कमी लेखणे बंद करा.

3. स्वत:ची मतं असणे हे तितकंच महत्त्वाचे आहे. योग्य वेळेस स्वत:ची मते मांडा.

आणखी वाचा - Rashmika Mandanna No Makeup Look :  रश्मिकाला मेकअपशिवाय पाहून चाहते हैराण

4. जर तुम्हाला त्या नात्यात राहताना त्रास होत असेल तर लवकरात लवकर त्यातून बाहेर पडा.

5. नात्यात होणाऱ्या मोठ्या चुका दुर्लक्षित करु नका.

6. जर तुम्हाला त्या नात्यात अपमानास्पद वागणूक मिळत असल्यास त्यातून लवकर बाहेर पडण्याचा चांगला मार्ग शोधा. 

7. कोणत्याही निर्णयावर पोहचण्याआधी शक्यतो संवाद साधा. समोरील व्यक्तीचा तुमच्या निर्णयांवर प्रभाव पडणार नाही याची काळजी घ्या. 

8. नात्यात दोन्ही व्यक्तींना एकमेकांची गरज असते. तुम्हाला खूप गरज आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करु नका.

आणखी वाचा - Garba Benefits: गरबा खेळण्याचे 'हे' फायदे वाचून लगेचच थिरकण्यास सुरुवात कराल

 (Disclaimer: वरील माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)