Health news : आपलं जीवन इतकं धावपळीचं झालं आहे की, आपल्याला स्वत:कडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. पुरुषांना याचा मोठा फटका बसू शकतो. पुरुषांना अशक्तपणा आणि थकवा जाणवतो. याचा परिणाम लैंगिक जीवनावर देखील होतो. पुरुषांचा स्टॅमिना ज्यामुळे कमी होतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला 5 अशा गोष्टी सांगणार आहोत. ज्या रात्री झोपताना खाल्ल्याने तुमच्या स्टॅमिना वाढू शकतो.
केळी ही पुरुषांसाठी फायदेशीर आहे. केळी पुरुषांमधील अशक्तपणा दूर करण्यासाठी मदत करते. केळीमध्ये ब्रोमिलेन एंग्जाईन असतं. हे एंग्जाईम लिबिडो आणि इंपोटेंस वाढवतो.
दूध आणि मध रात्री झोपण्यापूर्वी घेतल्याने पुरुषांच्या आरोग्याला चांगला फायदा होतो. दूध आणि मधात टेस्टोस्टेरोन हार्मोन वाढवण्याचे गुणधर्म असतात. हा एक सेक्सुअल हार्मोन आहे.
मेथीचे दाणे देखील पुरुषांमध्ये सेक्सुअल हार्मोन संतुलित करण्याचं काम करतात. गरम पाण्यात 2 चमचे मेथीचे दाणे टाकून उकळून घ्यावे. नंतर ते पाणी प्यायल्याने देखील समस्या कमी होतात.
दररोज भिजवलेले चणे खाल्ल्याने वजन वाढतं. एका रिसर्चनुसार, दररोज 50 ग्रॅम चणे खाल्ल्याने पुरुषांचं लैंगिक जीवन चांगलं राहतं.
खजूरचे सेवन तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये करु शकता. यामध्ये असलेले एमिनो एसिड पुरुषांमध्ये स्टेमिना वाढवण्याचं काम करतं.