पुरुषांमधील ही 10 लक्षणे असू शकतात कॅन्सरचे संकेत, याकडे कधीही दुर्लक्ष करु नका

 सुरुवातीच्या टप्प्यातच त्याची लक्षणे ओळखून तुम्ही त्यावर उपचार केलेत तर पुढे काही गंभीर होण्यापासून तुम्ही त्याला रोखू शकता.

Updated: Feb 3, 2022, 09:03 PM IST
पुरुषांमधील ही 10 लक्षणे असू शकतात कॅन्सरचे संकेत, याकडे कधीही दुर्लक्ष करु नका title=

मुंबई : जागतिक कर्करोग दिन दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. या गंभीर आजाराबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी, लक्षणे ओळखण्यासाठी आणि प्रतिबंध कसा करावा हे सांगण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. दरवर्षी लाखो लोक अपुरी माहिती उपचाराच्या अभावामुळे कर्करोगाने मरतात. कर्करोगाचा उपचार दीर्घकाळ चालतो आणि ज्यामुळे बरेच लोक आयुष्याची ही लढाई अर्धवट सोडून निघून जाता. परंतु सुरुवातीच्या टप्प्यातच त्याची लक्षणे ओळखून तुम्ही त्यावर उपचार केलेत तर पुढे काही गंभीर होण्यापासून तुम्ही त्याला रोखू शकता.

त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा लक्षणांबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही आधीच यावर उपाय करु शकता

लघवीच्या समस्या

काही पुरुषांमध्ये लघवीशी संबंधित समस्या वयानुसार वाढत जाताता. काही लोकं रात्री वारंवार लघवीला जातात. तर काही वेळा त्यांना लघवीवर नियंत्रण ठेवणेही शक्य होत नाही. लघवी करताना जळजळ होते आणि कधीकधी त्यातून रक्तही येते. तर हे लक्षात घ्या की, हे कर्करोग देखील असू शकते. अशी कोणतीही समस्या उद्भवल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. ते तुमच्या रक्ताची चाचणी करून घ्या

त्वचेत बदल

जर तुमच्या त्वचेवर तीळ किंवा चामखीळ असेल तर त्याचा आकार किंवा रंग बदलू लागतो. त्वचेवर काही डाग अचानक दिसू शकतात. असे काही दिसल्यास, कोणत्याही निष्काळजीपणाशिवाय, डॉक्टरांचा सल्ला घ्या. हे त्वचेच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. तुमचे डॉक्टर बायोप्सीची शिफारस करू शकतात.

अन्न गिळण्यात अडचण

कॅन्सरमुळे काही लोकांना अन्न गिळताना त्रास होतो. जर तुमचे वजन अचानक कमी होत असेल किंवा गिळताना त्रास होत असेल तर तुम्ही डॉक्टरांना भेटावे. तुमचा घसा किंवा पोटाच्या कर्करोगाची चाचणी करा. घशाची तपासणी करण्यासाठी तुमचा बेरियम एक्स-रे केला जाऊ शकतो.

छातीत जळजळ

जर तुम्हाला छातीत सतत जळजळ होत असेल आणि आहार बदलूनही ते ठिक होत नसेल, तर तुम्ही ते गांभीर्याने घेतले पाहिजे. छातीत तीव्र जळजळ पोट किंवा घशाच्या कर्करोगाशी संबंधित असू शकते. त्यामुळे वेळ न घालवता डॉक्टरांशी संपर्क साधावा.

तोंडात बदल

तुम्ही धूम्रपान करत असाल किंवा तंबाखू खात असाल तर तुम्हाला तोंडाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. त्यामुळे तोंडावर आणि ओठांवर पांढरे, लाल, तपकिरी किंवा पिवळे डाग दिसू शकतात. तुम्हाला तोंडात फोड देखील जाणवू शकतो जो अल्सरसारखा दिसतो. डॉक्टर तुम्हाला चाचण्या आणि उपचारांसाठी सल्ला देऊ शकतात.

जलद वजन घटणे

जर तुमचे वजन कोणत्याही प्रयत्नाशिवाय वेगाने कमी होत असेल तर ते तणाव किंवा थायरॉईडमुळे असू शकते. या समस्यांशिवायही, जर तुमचे वजन झपाट्याने कमी होत असेल, तर ते स्वादुपिंड, पोट किंवा फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. रक्त तपासणीद्वारे योग्य माहिती मिळू शकते.

टेस्टिकल्समध्ये बदल

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, टेस्टिकल्समध्ये गाठ, जडपणा किंवा कोणताही बदल दिसण्यास उशीर करू नये. योग्य वेळी आढळून आल्यास त्यावर उपचारही होऊ शकतात. हे शोधण्यासाठी, डॉक्टर तुमची रक्त तपासणी आणि अल्ट्रासाऊंड करू शकतात.

छातीत बदल

छातीत कोणत्याही प्रकारची गाठ जाणवणे हे पुरुषांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. सहसा पुरुष स्तनाशी संबंधित या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे ते खूप प्रगत अवस्थेत जाते येते. डॉक्टर म्हणतात की पुरुषांनी गाठीशी संबंधित कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.

थकवा

अनेक प्रकारच्या कॅन्सरमध्ये खूप थकवा येतो. पूर्ण विश्रांती घेऊनही हा थकवा जात नाही. हा थकवा खूप कामानंतरच्या थकव्यापेक्षा वेगळा असतो. तुम्हालाही असाच थकवा जाणवत असेल आणि त्यामुळे तुम्हाला तुमची दैनंदिन कामे करता येत नसतील, तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधावा.

जास्त खोकला

जास्त खोकला हे सहसा कॅन्सरचे लक्षण नसते आणि 3-4 आठवड्यांत तो स्वतःच बरा होतो. तथापि, जर तुमचा खोकला 4 आठवड्यांनंतरही कायम राहिला आणि त्यासोबत तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ते फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. यासाठी डॉक्टर तुमचा एक्स-रे करू शकतात.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमान करत नाही.)