coronavirus : आणखी एका बॉलिवूड सेलिब्रिटीचा बंगला सील

मुंबई महापालिकेकडून बंगला सील...

Updated: Jul 14, 2020, 07:34 PM IST
coronavirus : आणखी एका बॉलिवूड सेलिब्रिटीचा बंगला सील title=

मुंबई : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढतेच आहे. कलाविश्वातही कोरोनाने शिरकाव केला असून अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. अमिताभ बच्चन, अनुपम खेर, रेखा यांच्यानंतर आता बॉलिवूड दिग्दर्शिका झोया अख्तरचा बंगलाही मुंबई महापालिकेकडून सील करण्यात आला आहे. 

बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांच्या सिक्युरिटी गार्डला कोरोनाची लागण झाल्यानंतर रेखा यांचा बंगला सील करण्यात आला आहे. झोया अख्तरचा बंगला रेखा यांच्या बंगल्याच्या अगदी शेजारीच असल्याने सुरक्षेच्यादृष्टीने झोया अख्तरचाही बंगला सील करण्यात आला आहे.

Child of God : सुशांतच्या मृत्यूमुळे धक्का बसलेल्या अंकिताची ३० दिवसानंतर पहिली पोस्ट

 

Coronavirus : शेठ टाळी- थाळी वाजवली, आता डीजे लावू का; सेलिब्रिटीचा बोचरा सवाल

 

दरम्यान, अमिताभ बच्चन यांना कोरोना लागण झाल्याने त्यांना नानानटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बिग बींनंतर अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर अभिनेत्री सारा अली खाननेही तिचा ड्रायव्हर कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे. त्याआधी बोनी कपूर यांच्या घरात काम करणाऱ्या एका नोकरालाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं.