'त्या अभिनेत्याला पाहिल्यानंतर भीती वाटायची पण...', अभिनेत्रीचा मोठा खुलासा

बाबा रामदेव यांच्याकडे प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा  

Updated: Sep 27, 2022, 03:40 PM IST
'त्या अभिनेत्याला पाहिल्यानंतर भीती वाटायची पण...', अभिनेत्रीचा मोठा खुलासा title=

मुंबई : झगमगत्या विश्वातील अशा अनेक गोष्टी ज्या कालांतराने समोर येतात. पण त्या गोष्टी समोर आल्यानतंर सर्वत्र खळबळ माजते. बॉलिवूडमध्ये असे अनेक किस्से आहेत, जे आज देखील चर्चेत आहेत. एका कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेत्री  झीनत अमान (Zeenat Aman) यांनी त्यांच्या करियरच्या सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणी ताज्या केल्या आणि एक महत्त्वाचा किस्सा सांगितला. शूटिंग सुरू असताना अभिनेते देव आनंद यांनी झीनत यांच्या अस्वस्थतेवर मात कशी केली, याबद्दल त्यांनी एक किस्सा सांगितला. 

टीव्ही शोच्या एका कार्यक्रमात अभिनेत्री झीनत बाबा रामदेव (ramdev baba) यांच्यासोबत देव आनंद यांच्या स्पेशल एपिसोडसाठी उपस्थित होत्या. यावेळी देव आनंद (Dev Aanand) यांच्या आयुष्याबद्दल आणि त्यांच्या कामगिरीबद्दल गप्पा रंगल्या. 

यावेळी झीनत म्हणाल्या, 'मी खूप घाबरली होती. नव्या कलाकारांना कॅमेऱ्यासमोर भीती वाटू नये म्हणून देव साहबांची स्वतःची वेगळी पद्धत होती. ते आधीचं आमच्यासोबत डायलॉग बोलायचे. म्हणजे आम्ही ते वाचू, समजू शकू...' (Zeenat Aman on Dev Aanand)

त्या पुढे म्हणाल्या, आम्ही काठमांडूमध्ये होतो जिथे त्यांनी मला सेटवर नेलं आणि इतर कलाकार काय करत आहेत, हे पाहण्यास सांगितलं. कॅमेऱ्यासमोर येण्यासाठी मी उत्सक होते, अखेर त्यांनी माझी उत्सुकता दूर केली आणि देव आनंद यांनी मला सादर केलं.' देव आनंदसोबत असलेली ही आठवण झीनत यांनी शोमध्ये रामदेव यांना सांगितली.  (Bollywood News)