डान्स महाराष्ट्र डान्स मध्ये नटसम्राटच्या डायलॉग्सवर आधारित दमदार परफॉर्मन्स

झी युवा नेहमीच फ्रेश आणि उत्कृष्ट कॉन्टेन्टने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आलेले आहे. डान्स महाराष्ट्र डान्स या डान्स या कार्यक्रमाने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. बहारदार परफॉर्मन्सेस आणि सर्वोत्कृष्ट डान्स फॉर्म्सचा आनंद प्रेक्षक या रीऍलिटी शोच्या माध्यमातून लुटतात. स्पर्धकांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्याकडून नेहमीच उत्तमोत्तम परफॉर्म करून घेण्याची जबाबदारी या कार्यक्रमाचे चे तीन परीक्षक म्हणजेच सिद्धार्थ जाधव, फुलवा खामकर आणि  आदित्य सरपोतदार चोख पार पाडत आहेत.

Dakshata Thasale Updated: Mar 29, 2018, 02:33 PM IST
डान्स महाराष्ट्र डान्स मध्ये नटसम्राटच्या डायलॉग्सवर आधारित दमदार परफॉर्मन्स title=

मुंबई : झी युवा नेहमीच फ्रेश आणि उत्कृष्ट कॉन्टेन्टने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आलेले आहे. डान्स महाराष्ट्र डान्स या डान्स या कार्यक्रमाने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. बहारदार परफॉर्मन्सेस आणि सर्वोत्कृष्ट डान्स फॉर्म्सचा आनंद प्रेक्षक या रीऍलिटी शोच्या माध्यमातून लुटतात. स्पर्धकांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्याकडून नेहमीच उत्तमोत्तम परफॉर्म करून घेण्याची जबाबदारी या कार्यक्रमाचे चे तीन परीक्षक म्हणजेच सिद्धार्थ जाधव, फुलवा खामकर आणि  आदित्य सरपोतदार चोख पार पाडत आहेत.

आगामी एपिसोडमध्ये प्रेक्षक फिल डान्स क्रूचा नटसम्राट मधील प्रसिध्द डायलॉग्सवरील अद्वितीय परफॉर्मन्स पाहू शकणार आहेत. या वेगळ्या प्रयत्नासाठी परीक्षकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव देखील केला . त्यांचा अॅक्ट इतका सुंदर होता की सिध्दार्थ जाधव त्या टीमला मानवंदना देताना दिसणार आहे. तर दुसरीकडे, वायके ग्रुप या चिपळूण सारख्या छोट्या शहरातून आलेल्या ग्रुपला लोकांचा जास्तीत जास्त पाठिंबा मिळाला आहे. या एपिसोड मध्ये फोक, फ्रिस्टाईल, फ्यूजन, हिप-हॉप, कंटेम्पररी असे अनेक प्रकार पहायला मिळणार आहेत आणि ती कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये  असणार आहेत. 

सुव्रत जोशी हा शोचा होस्ट आहे. या शोमध्ये वेगवेगळ्या भागातील कला पाहायला मिळते. या शोच्या माध्यमातून लपून राहिलेले टॅलेंट जगासमोर येण्यास मदत होत आहे.