ऋतिक रोशनच्या दोन नव्या फ्लॅटची किंमत ऐकून व्हाल थक्क

मुंबईमध्ये घर असवं अशी प्रत्येकाची इच्छा असते.

Updated: Oct 25, 2020, 05:43 PM IST
ऋतिक रोशनच्या दोन नव्या फ्लॅटची किंमत ऐकून व्हाल थक्क title=

मुंबई : अभिनेता ऋतिक रोशनने नुकताच दोन नव्या फ्लॅटची खरेदी केली आहे. ज्यांची किंमत जवळपास ९७.५ कोटी रुपये असेल. अपार्टमेंटचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या घरातून आरबी समुद्राचा नयनरम्य देखावा दिसत आहे. मुंबईमध्ये घर असवं अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि तेही समुद्र किनाऱ्या जवळ असेल तर दररोज समुद्रांच्या उसळत्या लाटांचा आवाज आणि मोकळी हवा, सुंदर दृश्यांचा अनुभव रोज घेता येतो. 

ऋतिकने विकत घेतलेल्या दोन घरांमध्ये एक घर अपार्टमेंटमध्ये आहे तर दुसरं घर एका मजल्याचं आहे. आमची सहयोगी वेबसाईट Bollywoodlife.com ने दिलेल्या रिपोर्टनुसार या आठवड्याच्या सुरवातीला त्याच्या दोन्ही घरांचे करार पूर्ण झाले. ज्याची किंमत ९७.५ कोटी रूपये आहे.

जुहू-वर्सोवा लिंक रोडवर असलेल्या १६ व्या मजल्याच्या इमारतीत हे अपार्टमेंट १४ व्या आणि १५ व्या मजल्यावर आहेत. त्याच्या घरातून आरबी समुद्राचा देखावा दिसतो. ऋतिकचं हे घर ३८ हजार चौरस फूट भागात पसरलेले आहे. शिवाय ६ हजार ५०० चौरस फूट जागेत उच्ची असून १० पार्किंग स्पॉट्स आहेत. तर १४ व्या मजल्याच्या अपार्टमेंटसाठी त्याला ३० कोटी रूपये मोजावे लागले आहेत.