मुंबई : अभिनेत्री यामी गौतमला ईडीने समन्स दिला आहे. यामीला FEMA (Foreign Exchange Management Act ) संबंधित उल्लंघन केल्याप्रकरणी चौकशीकरता बोलवण्यात आलं आहे. मुंबईत ईडीच्या झोन 2 मध्ये चौकशी होणार आहे. अभिनेत्रीला हा दुसरा समन देण्यात आला आहे.
Mumbai: Enforcement Directorate (ED) summons actor Yami Gautam, asking her to appear before them next week to record her statement in connection with alleged irregularities under FEMA (Foreign Exchange Management Act).
(File photo) pic.twitter.com/orR0zzk2nn
— ANI (@ANI) July 2, 2021
यामीला 7 जुलै रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. फेमा कायद्यांतर्गत यामी गौतमची चौकशी होणार आहे. परदेशी चलन व्यवहारात अनियमितता बाबत हा समन्स देण्यात आला आहे. यामीचे काही व्यवहार चौकशीमध्ये आले आहेत. याचा प्राथमिक अंदाजात मिळालेल्या माहितीनुसार, व्यवहारात गोंधळ आढळला आहे. ज्यानंतर समन्स जाहीर करण्यात आलं आहे.
यामी गौतम एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत अनेक मोठ्या सिनेमांत काम केलंय. यामीला एका ब्युटी प्रोडक्टच्या जाहिरातीमधून लोकप्रियता मिळाली. तिने अनेक बॉलिवूड सिनेमात काम केलं आहे. उरी, काबिल, सनम रे, गिन्नी वेड्स सनी, विक्की डोनर, बाला, बदलापुर, टोटस सियापा सारख्या सिनेमात काम केलं आहे.