वर्ल्ड म्युजिक डे निमित्त झिंग संगीत प्रेमींसाठी सादर करणार 'झिंग फॅन जॅम'

सोशल मीडियामुळे सगळे एकमेकांशी संवाद साधू शकत आहेत

Updated: Jun 19, 2020, 04:01 PM IST
वर्ल्ड म्युजिक डे निमित्त झिंग संगीत प्रेमींसाठी सादर करणार 'झिंग फॅन जॅम' title=

मुंबई : कोरोना व्हायरसमुळे महिन्यांपासून असलेल्या टाळेबंदीमधून हळूहळू संपूर्ण जग आता सावरत आहे. पण हा काळ कोणी सहसा विसरू शकणार नाही. या काळात चित्रपट, नाटक आणि संगीत क्षेत्रात देखील अनेक कन्टेन्ट इनोव्हेशन पाहायला मिळाले. संगीतमध्ये अशी जादू आहे कि या कठीण काळात देखील सगळ्यांचा साथी बनून त्यांचा ताण कमी करण्यासाठी संगीत मदत करतं आणि नेहमीच करतं राहील. रविवार २१ जून रोजी असलेल्या 'वल्ड म्युजिक डे'च्या निमित्ताने झिंग हि वाहिनी सादर करणार आहे 'झिंग फॅन जॅम' ज्यामध्ये फॅन्सना आकांक्षा शर्मा, स्टेबिन बेन, यासिर देसाई, ज्योतिका टांगरी आणि शिवांगी भयाना या गायकांसोबत जुगलबंदी करण्याची संधी मिळणार आहे.  

सोशल मीडियामुळे सगळे एकमेकांशी संवाद साधू शकत आहेत आणि म्हणूनच झिंग संगीत प्रेमींना त्यांच्या आवडत्या गायकासोबत जुगलबंदी करण्याची आणि टीव्हीवर झळकण्याची हि सुवर्ण संधी देत आहे. झिंग १५ भाग्यवान फॅन्सची निवड करेल ज्यांना त्यांच्या आवडत्या गायकासोबत गाण्याची संधी मिळणार आहे. हा 'फॅनजॅम' सेगमेंट वर्ल्ड म्युजिक डे च्या निमित्ताने २१ जून रोजी संपूर्ण दिवस झिंग वाहिनीवर दाखवण्यात येईल. इतकंच नव्हे तर हे गायक 'वर्ल्ड म्युजिक डे'ला झिंगच्या इंस्टाग्रामवर लाईव्ह येऊन त्यांच्या फॅन्स सोबत संवाद देखील साधणार आहेत.    

याबद्दल बोलताना झील म्युजिक क्लस्टरचे डेप्युटी बिझनेस हेड पंकज बल्हारा म्हणाले, "वर्ल्ड म्युजिक डेच्या निमित्ताने झिंग वाहिनीला प्रेक्षक आणि संगीतप्रेमींसाठी काहीतरी खास करायचं होतं. संगीत आपल्या जीवनातील एक अविभाज्य भाग आहे. संगीत आपल्याला जोडून ठेवत आणि कठीण काळात आपल्याला प्रेरणा देतं. झिंग फॅन जॅममुळे फॅन्स घरबसल्या सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून आपल्या आवडत्या कलाकारांशी जोडले जाऊ शकतात. फॅन्सना त्यांच्या आवडत्या कलाकारांसोबत इंटरॅक्टिव्ह ऍक्टिव्हिटी करता यावी आणि त्यांच्यासोबत म्युजिक साजरं करता यावं हा या संकल्पने मागचा विचार आहे. आमचा असा विश्वास आहे कि म्युजिक हे सकारात्मकता पसरवतं आणि ते उपचारात्मक देखील असतं, त्यामुळे 'वर्ल्ड म्युजीक डे' हि एक उत्तम संधी आहे संगीत प्रेमींसोबत संगीत साजरं करण्याची." 

आर्टिकल १५ या चित्रपटात पार्श्वगायक केल्यामुळे नावारूपाला आलेली गायिका आकांक्षा शर्मा म्हणाली, "मी या 'झिंग फॅनजॅम' सेगमेंटसाठी आणि माझ्या फॅन्स सोबत संवाद साधण्यासाठी खूप उत्सुक आहे. म्युजिक हा आपल्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग आहे आणि सध्याच्या काळात संगीत हाच माझा एकमेव साथी आहे. मी आशा करते कि मी झिंग फॅन जॅम मधून म्यूजिकद्वारे आनंद पसरवू शकेन."

परमाणू आणि गोल्ड या चित्रपटात पार्श्वगायन केलेला गायक यासिर देसाई म्हणाला, "झिंग फॅन जॅम हि संकल्पना मला खूपच इंटरेस्टिंग वाटली. याच्यामुळे आम्ही डिरेक्टली आमच्या फॅन्स सोबत जोडले जाऊ. मी या निमित्ताने माझ्या सर्व फॅन्सना विनंती करतो कि तुम्ही वर्ल्ड म्युजिक डेला आमच्या सोबत जोडले जा, आम्ही तुमच्यासाठी काहीतरी खास प्लॅन केला आहे."

पल्लो लटके गाण्याची पार्श्वगायिका ज्योतिका टांगरी म्हणाली, "मी माझ्या फॅन्स सोबत व्हर्च्युअली संवाद साधण्यासाठी खूपच उत्सुक आहे. मी आशा करते कि झिंग फॅन जॅम सोबत आम्ही सर्व हा वर्ल्ड म्युजिक डे सगळ्यांसाठी खास करू शकू."
रुला के गया इष्क गाण्याचा गायक स्टेबिन बेन सांगतो, "चाहत्यांच प्रेम हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. झिंग फॅन जॅममुळे आम्हाला त्यांच्यासोबत बोलण्याची आणि परफॉर्म करण्याची संधी मिळाली आहे. मी हा वर्ल्ड म्युजिक डे झिंग सोबत साजरा करण्यासाठी खूप उत्सुक आहे."

शादी मे जरूर आना आणि हॅपी फिर भाग जायेगी या चित्रपटात गाणी गायलेली गायिका शिवांगी भयाना म्हणाली, "मी झिंग फॅन जॅमचा एक हिस्सा असणार असल्याची मला खूप उत्सुकता आहे. डिजिटल मिडीयममुळे आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो आणि यावर्षी वर्ल्ड म्युजिक डे साजरा करण्याचा यापेक्षा चांगला कुठला पर्याय असेल. आम्ही या ऍक्टिव्हिटीसाठी फॅन्स आणि संगीतप्रेमींकडून भरगोस प्रतिसादाची अपेक्षा करतोय."  

म्युजिक हा आपल्या आयुष्यातील आणि आपणा सर्वांना जोडणारा एक महत्वाचा दुआ आहे. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र येऊन झिंग फॅन जॅम सोबत २१ जून २०२० रोजी हा वर्ल्ड म्युजिक डे आपण साजरा करूया आणि @zingtv या त्यांच्या सोशल मीडियावर या गायकांशी संवाद साधूया.