करिना कपूर खान निवडणुकीत उभी राहणार का?

 भोपाळमध्ये युवा मतदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे करिना तरुणांना आकर्षित करु शकते.

Updated: Jan 20, 2019, 05:44 PM IST
करिना कपूर खान निवडणुकीत उभी राहणार का?  title=

मुंबईअभिनेत्री करीना कपूर सध्या एमपीच्या राजकारणात आपले नशीब आजमवण्याचा प्रयत्न करत आहे.भोपाळच्या कॉंग्रेसने करीनाला भोपाळमधून लोकसभा निवडणुकीत उभे राहण्याची मागणी केली आहे. गेले 40 वर्ष कॅंग्रेस भोपाळ मधील सीट हारत आहे.करिना कपूर खान भोपाळची निवडणुक जिंकू शकते. भोपाळ करिनाचे सासर आहे. आणि करिना पति सैफ अली खान सोबत नेहमीच भोपाळमध्ये जात असते. त्यामुळे कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी करीनाला काँग्रेसचा उमेदवार म्हणून उभे राहण्याची मागणी केली. कॅंग्रेस नेते गुड्डू चौहान, अमित शर्मा आणि मोनू सक्सेना यांनी कॉंग्रेसच्या वरिष्ठांपर्यंत ही गोष्ट पोहचवली आहे. मध्य प्रदेशात आपली सरकार आल्या नंतर काँग्रेस कार्यकर्ते खूश आहेत.आणि आता लोकसभेच्या निवडणुकीत बाजी मारण्याच्या तयारीत आहेत.भोपालमध्ये युवा मतदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे करिना तरुणांना आकर्षित करु शकते. असे मत कॉंग्रेस नगरसेवक अमित शर्मा यांनी व्यक्त केले आहे. तर कॉंग्रेस नगरसेवक मोनू सक्सेना यांनी जुन्या भोपालचे मतदान हे नवाब कुटुंबाला पाहून प्रभावित होत असे.

भाजप साठी भोपाळमध्ये निवडणुन येणे अतिशय सोपे आहे. एक वेळेस नवाब मंसूर अली खान यांनी कॉंग्रेस मधून निवडणुक लढवली आहे. पण ते सत्तेत येवू शकले नाही.शर्मिला टैगोर सुद्धा राजकारणात सक्रिय असतात. निवडणुकांच्या प्रचारासाठी त्या येत असतात. त्यांच्या नावावर सुध्दा चर्चा झाली होती. पण शर्मिला निवडणुकीत उभ्या राहील्या नाहीत.सैफ अली खान आणि करीना कपूरलग्नानंतर अनेक वेळा भोपाळमध्ये येत असतात. पण ते राजकारणात सक्रिय नसतात.