मुंबई : सुरभी हांडे छोट्या पडद्यावर झळकत नसली तरी ती, सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. यानंतर सुरभीकडे कोणताही मोठा प्रोजेक्ट नव्हता. मात्र आता अभिनेत्री लवकरच सोनाली कुलकर्णीची मुख्य भूमिका असणाऱ्या 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' या ऐतिहासिक चित्रपटात झळकणार आहे. या मालिकेनंतर सुरभी 'लक्ष्मी सदैव मंगलम' या मालिकेत दिसली होती. तसेच ती 'अगं बाई अरेच्चा 2' या चित्रपटात झळकली होती. म्हाळसा देवीच्या भूमिकेमुळे जळगाव, भंडाराची रहिवासी असणाऱ्या सुरभी हांडेला तुफान लोकप्रियता मिळाली होती. सुरभी हांडेचा जन्म नागपूरमधील भंडारा तालुक्यात झाला. तिचे वडील जळगावमधील आकाशवाणीवर संगीतकार म्हणून कामाला होते. तिचे बारावीपर्यंत शिक्षण जळगांवलाच झालं. आई शास्त्रीय गायिका व कॉलेजमध्ये शिकवायला होती.
सध्या सगळीकडे राजकीय धुराळा सुरुये. अनेक कलाकारही राजकारणात प्रवेश करत आहेत. तर नुकतंच सुरभीने यावंर भाष्य केलं आहे. या विषयी बोलताना सुरभी म्हणाली, आज जिथे तिथे बिजेपी आहे. अनेक गोष्टी छान घडतायेत आत्ता नवीन नवीन ज्याच्या लोकांना अपेक्षाही नव्हत्या. छान आपल्या इंडियात काही होवू शकतं. किंवा आत्ता महाराष्ट्रात सुद्धा. तर मला असं वाटतं की, याचा छोटाचा पार्ट व्हायला आवडेल. त्यामुळे येत्या काळात सुरभी हांडे राजकारणात दिसू शकते. असं तिच्या बोलण्यातून जाणवलं. प्लॅनेट मराठील्या दिलेल्या मुलाखतीत सुरभी असं म्हणाली.
सुरभी हांडे नावाच्या अभिनेत्रीचा 'संघर्षयोद्धा' हा नवीन चित्रपट येणार आहे. त्यामध्ये तिची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. 'भुताटलेला 'ही वेबसीरिज केली. नेटफ्लिक्सवर 'अगं बाई अरे चा २' आणि 'ताराराणी' हे चित्रपटदेखील केले. आता तिचा 'संघर्षयोद्धा' हा चित्रपट येतोय. या चित्रपटाची कथा मनोज जरांगे पाटील यांची आहे. त्यांच्या पत्नीच्या महत्त्वपूर्ण भूमिकेमध्ये ती आपल्याला पाहायला मिळणार आहे.
सुरभीचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी काही ना काही शेअर करत असते. अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर कायम काहीना काही शेअर करत असते.