मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांना आजही रंगीला गर्ल म्हणून ओळखले जाते कारण हा चित्रपट त्यांच्या करिअरमधील सर्वात मोठा चित्रपट होता.
उर्मिला यांनी मार्च 2016 मध्ये मोहसिन अख्तरसोबत लग्न केल्यानंतर अभिनय करिअरमधून ब्रेक घेतला आणि त्यानंतर त्या कोणत्याही चित्रपटात दिसल्या नाहीत. त्यांच्या फिल्मी करिअरपासून ते वैयक्तिक आयुष्यापर्यंत अनेक गोष्टी उर्मिलाने एका मुलाखतीत सांगितल्या आहेत.
47 वर्षीय उर्मिला यांना जेव्हा विचारण्यात आले की, मातृत्वाबद्दल त्यांचे काय मत आहे आणि ती कधी आई होण्याचा विचार करत आहे? ती मूल दत्तक घेण्याच्या विचारात आहे का? या प्रश्नांची उत्तरे देताना उर्मिला म्हणाली, होय आणि नाही, जेव्हा व्हायचे असेल तेव्हा होईल. मी त्याचा फारसा विचार करत नाही.
प्रत्येक स्त्रीने आई असणे आवश्यक नाही. मातृत्व योग्य कारणांसाठी असावे. मला मुलं आवडतात पण जगात अशी अनेक मुलं आहेत ज्यांना प्रेम आणि काळजीची गरज आहे. आपण त्यांना जन्म देणे आवश्यक नाही.
जेव्हा उर्मिला यांना अभिनय कारकिर्दीला अलविदा करण्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्या म्हणाल्या, मी माझ्या अभिनय कारकीर्दीचा त्याग केलेला नाही, पण आयुष्यात अनेक टप्पे येतात आणि त्या सर्व टप्प्यांवर माझा विश्वास आहे. लग्न झाल्यावर मला त्याचा आनंद घ्यायचा होता. आयुष्य एका ट्रॅकवर चालवण्यावर माझा विश्वास नाही. त्याची अनेक रूपे असायला हवीत.
उर्मिला पुढे म्हणाल्या, मला सर्व काही मोकळेपणाने जगायचे आहे. चित्रपट हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम भाग आहे पण ते माझ्या आयुष्यापुरते मर्यादित नाही. एखादा प्रकल्प माझ्याकडे आला, मला तो करावासा वाटला, तर मी तो नक्कीच स्वीकारेन