'झुंड' सिनेमा मराठीत का नाही? या प्रश्नावर नागराजचं चपखल उत्तर

अमिताभ बच्चन यांच्यासोबत नागराज मंजुळेचा पहिली हिंदी सिनेमा 'झुंड' ४ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला 

Updated: Mar 2, 2022, 01:22 PM IST
'झुंड' सिनेमा मराठीत का नाही? या प्रश्नावर नागराजचं चपखल उत्तर  title=

मुंबई : बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांचा प्रमुख भूमिका असलेला 'झुंड' हा सिनेमा ४ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच एक वाद चर्चेत आहे. (Why Jhund is not done in Marathi language Director Nagraj Manjule gave specific answer)  या वादाला दिग्दर्शक नागराज मंजुळेने चपराख उत्तर दिलं आहे. 

नागराज मंजुळे बहुचर्चित सिनेमा 'झुंड' हा पहिला हिंदी सिनेमा आहे. नागराजने हा सिनेमा मराठीत का केला नाही? सोशल मीडियावर याबाबत नागराजला प्रश्न विचारला जात आहे. 

नागराजने या प्रश्नाला दिलं सडेतोड उत्तर 

नागराजने या प्रश्नाला सडेतोड उत्तर देत म्हटलं की, “मग मी म्हणतो पुष्पा मराठीत का नाही केला? किंवा तेलगूत का पाहिला, हिंदीत का पाहिलात? मी फेसबूकवर पण पाहतो, सोशल मीडियावर काही सेन्सिबल गोष्टींवर चर्चा होत नाही. पण मला ही गंमत वाटते की, झुंड मराठीत केला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त होतेय. ('मी निःशब्द...', आमिर खानकडून नागराजच्या 'झुंड'चं कौतुक) 

मग बच्चन साहेबांनी पण मराठीत केला पाहिजे ना. बच्चन साहेबांनी मराठी शिकून मराठी भाषेत चित्रपट करता येईल इतका रुबाब मराठी भाषेचा आणि दिग्दर्शकाचा म्हणजे माझा पाहिजे. त्यासोबत तेवढा वेळ पाहिजे. निर्मात्यांनी तेवढे पैसे दिले पाहिजे की बच्चन साहेब मराठीत चित्रपट करतील.”

हे ही काही सोपं नंसत. मी पहिला हिंदीत चित्रपट केला आहे. उद्या असं होईल की बच्चन साहेब मराठीत चित्रपट करतील, असं ही नागराज म्हणाला.