19 वर्षाचा हा मुलगा ४-५ वर्षांच्या लहान मुलासारखा का दिसतो...

वयाच्या पाचव्या वर्षानंतर अब्दूची उंचीत वाढ होणे थांबले होते, असे सांगितले जात आहे.

Updated: Oct 13, 2022, 09:10 PM IST
19  वर्षाचा हा मुलगा ४-५ वर्षांच्या लहान मुलासारखा का दिसतो... title=
Why does this 19 year Abdu Rozik look like a 4-5 year old kid nz

Big Boss-16: बिग बॉस १६ (Big Boss-16) चा स्पर्धक- अब्दू रोजिकला (Abdu Rozik) या सीझनमध्ये प्रेक्षकांची चांगलीच पहिली पसंती मिळाली आहे. रोझिक हा मूळचा ताजिकिस्तानचा असून, तो १९ वर्षांचा आहे, पण तो दिसायला ४-५ वर्षांच्या लहान मुलासारखा दिसतो. वयाच्या पाचव्या वर्षानंतर अब्दूची उंचीत वाढ होणे थांबले होते, असे सांगितले जात आहे. (Why does this 19 year Abdu Rozik look like a 4-5 year old kid nz)

मीडियाच्या रिपोर्ट्सनुसार, अब्दू रोजिकला ग्रोथ हार्मोनची कमतरता असल्यामुळे या समस्येला सामोरे जावे लागत आहे, त्याला रिकेट्सचीही समस्या आहे. आज आम्ही तुम्हाला या दोन समस्यांविषयी सांगणार आहोत...

आणखी वाचा - भारत कधीही झुकणार नाही असं म्हणत Allu Arjun भावूक झाला...

 

ग्रोथ हार्मोनच्या कमतरतेची समस्या काय आहे

ग्रोथ हार्मोन डेफिशियन्सी (GHD) मुळे एखाद्या व्यक्तीमध्ये ठेंगणेपणा येऊ शकतो. ही समस्या जन्मजात असू शकते किंवा काही वर्षानंतर ही याचे परिणाम होऊ शकतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पिट्यूटरी ग्रंथीद्वारे अतिशय कमी प्रमाणात ग्रोथ हार्मोन तयार झाल्यामुळे अशा प्रकारची समस्या उद्भवू शकते. याशिवाय जनुकीय दोष, मेंदूला गंभीर दुखापत होणे किंवा जन्मापासूनच पिट्युटरी ग्रंथी नसणे यामुळेही ही समस्या उद्भवू शकते.

काही मुलांमध्ये मेंदूतील ट्यूमरमुळेही ही समस्या नंतर उद्भवू शकते. सामान्यतः ट्यूमर पिट्यूटरी ग्रंथी किंवा मेंदूजवळील हायपोथालेमस क्षेत्रावर परिणाम करू शकतो, ज्यामुळे हार्मोन्सच्या स्रावावर परिणाम होतो. यामुळे, शरीराची लांबी कमी होणे सर्वात सामान्य आहे, या विकारामुळे मुलींमध्ये स्तनाचा विकास किंवा इतर अनेक समस्या उद्भवू शकतात.

ग्रोथ हार्मोनची कमतरता कशी शोधायची?

जर मुलाची वयानुसार वाढ होत नसेल किंवा त्याचा बौद्धिक विकास कमी होत असेल तर ते ग्रोथ हार्मोनच्या कमतरतेमुळे असू शकते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ही समस्या रक्त तपासणीने शोधली जाऊ शकते, जरी ती फारशी अचूक चाचणी मानली जात नाही. म्हणूनच डॉक्टर काही विशेष चाचण्या करण्याची शिफारस करतात. एकदा का समस्या स्पष्ट झाल्यास, हार्मोनल थेरपीद्वारे उपचार केले जाऊ शकतात, परंतु या थेरपीचे अनेक दुष्परिणाम देखील होऊ शकतात.

आणखी वाचा - उर्फी जावेद पुन्हा त्याचाच प्रेमात? इन्स्टाग्रामवर उघड केलं प्रेम

 

मुडदूस समस्या

अब्दूची दुसरी समस्या म्हणजे रिकेट्स. हे सहसा व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होते. अनुवांशिक धोके देखील असू शकतात. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडांमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसची योग्य पातळी राखणे कठीण होते कारण व्हिटॅमिन डी शरीराला अन्नातून कॅल्शियम आणि फॉस्फरस शोषण्यास मदत करते. रिकेट्समुळे मुलांची हाडे मऊ आणि कमकुवत होतात. या समस्येमुळे हाडे सहज तुटण्याचा धोकाही असतो.