लग्नाआधीच एकत्र राहत होते आलिया-रणबीर; अभिनेत्रीने सांगितलं 'या' मागचं कारण

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या खूप चर्चेत आहे. 

Updated: Aug 22, 2022, 10:32 PM IST
लग्नाआधीच एकत्र राहत होते आलिया-रणबीर; अभिनेत्रीने सांगितलं 'या' मागचं कारण title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या खूप चर्चेत आहे. आलिया लवकरच पती रणबीर कपूरसोबत 'ब्रह्मास्त्र' या आगामी चित्रपटात दिसणार आहे. करिअरसोबतच आलिया तिच्या प्रेग्नेंसीमुळे देखील चर्चेत आहे. या अभिनेत्रीने तिच्या नावासमोर कपूर आडनाव लावलं होतं. त्यामुळे बराच गदारोळ झाला होता. अलीकडेच अभिनेत्रीने फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत लिव्ह इन रिलेशनशिपवर आपलं मत मांडलं आहे.

रणवीर-आलिया अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते
रणबीर आणि आलियाचं लग्न एप्रिल २०२२ मध्ये झालं होतं. लग्नाआधी रणबीर आणि आलिया अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते आणि ते एकत्र राहू लागले होते. आता बऱ्याच वर्षांनंतर आलियाने लिव्ह इन हा योग्य निर्णय असल्याचं म्हटलं आहे. जेव्हा मीडियाने तिला विचारलं की ती बाकीच्या जोडप्यांना लिव्ह-इन रिलेशनशिप सुचवेल का?

लिव्हइन रिलेशनवर आलियाचं वक्तव्य
या प्रश्नावर आलिया म्हणाली, "डेटींग केल्यानंतर ती थेट रणबीरशी लग्न करणार होती. पण महामारीच्या काळात तिने एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. महामारीने सगळी कामं थांबवली होती. त्यामुळे आम्ही एकाच छताखाली एकत्र राहत होतो."  आलिया पुढे म्हणाली, "जर राहता येत असेल तर का नाही? मला वाटतं हे छान आहे. तुम्हांला एकमेकांची सवय झाली आहे आणि एकमेकांशी आराम मिळतो, तुम्ही दबावाशिवाय आणि लग्न न करताही खूप आठवणी जोडता."

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर रणबीर आणि आलिया 'ब्रह्मास्त्र'मध्ये एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. हा चित्रपट या वर्षी सप्टेंबरमध्ये रिलीज होणार आहे. यात अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.