सलमानची कॉपी करत विकीकडून कतरिनाला प्रपोज, पाहा व्हिडिओ

सध्या सोशल मीडियावर कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नाच्या बातम्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Updated: Oct 30, 2021, 04:47 PM IST
सलमानची कॉपी करत विकीकडून कतरिनाला प्रपोज, पाहा व्हिडिओ title=

मुंबई : सध्या सोशल मीडियावर कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नाच्या बातम्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. इंटरनेटवर दोघांच्या जोडीचा बोलबाला आहे. कधी दोघांचे फोटो व्हायरल होत असतात. तर कधी दोघांचे जुने आणि हृदयाला स्पर्श करणारे व्हिडिओ दोघांच्या फॅन पेजवर प्रचंड शेअर केले जातात. त्याचसोबत, नुकताच या दोघांचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये विकी कौशलने स्टेजवरच कतरिना कैफला लग्नासाठी प्रपोज करतो. इतकंच नाही तर या अवॉर्ड फंक्शनला सलमान खानही हजेरी उपस्थित होता. तर कतरिनाला प्रपोज केल्यानंतर विकीची रिएक्शन पाहण्यासारखी आहे.

विक्कीने प्रपोज केल्यानंतर सलमान खानची रिएक्शन 
जेव्हापासून विकी कौशल आणि कॅटच्या लग्नाची बातमी व्हायरल झाली, तेव्हापासून दोघांच्या रोमँटिक आणि खास व्हिडिओंनीही इंटरनेटवर वर्चस्व गाजवलं. नुकताच या दोघांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये, एवॉर्ड फंक्शनमध्ये स्टेजवरच सलमान खानची लोकप्रिय डान्स स्टेप करून विकीने कतरिनाला प्रपोज केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यानंतर सलमान खानची प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे आणि तो आश्चर्यचकित दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

इतकी वर्षे एकमेकांना डेट करत आहेत
सूत्रांनुसार, विकी आणि कतरिना दोघंही 2019 पासून एकमेकांना डेट करत आहेत. त्याचवेळी त्यांच्या लग्नाच्या बातम्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. उडत्या अफवांनुसार, दोघेही डिसेंबरमध्ये लग्न करणार आहेत. मात्र अद्याप तरी या दोघांनीही यावर कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. कतरिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती सूर्यवंशीमध्ये दिसणार आहे.