मुंबई : अभिनेत्री राणी मुखर्जी सिनेसृष्ट्रीत दिग्गज अभिनेत्री पैकी एक आहे. तिने आत्तापर्यंत बॉलिवूडला एका पेक्षा एक हिट सिनेमा दिले आहेत. तिचा चाहाता वर्ग खूप मोठा आहे. आज असं कोणीच नाही जो राणीला ओळखत नसेल. राणी मुखर्जीने अमिताभ बच्चन यांच्यासोबत आत्तापर्यंत अनेक हिट सिनेमा दिले आहेत. पण जेव्हा राणीने अमिताभ बच्चन यांच्यासोबत संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात काम केलं तेव्हा या सिनेमाने खळबळ माजवली. ब्लॅक या सिनेमात या दोघांनी बोल्ड सीन दिले. हा सिनेमा 2005 मध्ये प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले.
ब्लॅक या सिनेमात राणी आणि अमिताभ यांनी लिप लॉक सीनने खळबळ उडवून दिली होती. या सिनेमामध्य़े अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्यामध्ये लिप लॉक किसिंग सीनही दाखवण्यात आला होता. जया बच्चनही या सीनमुळे प्रचंड नाराज झाल्या होत्या. एवढंच नव्हेतर राणी मुखर्जीसाठी 'ब्लॅक' चित्रपटात अमिताभ बच्चनसोबत किसिंग सीन देणं खूप कठीण होतं. असंही म्हटलं जातं की हा सीन केल्यानंतर राणीची तब्येतही बिघडली होती.
ट्रिब्यून इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये राणी मुखर्जी म्हणाली, "मी सांगूही शकत नाही की, माझ्यासाठी तो लिपलॉक सीन किती कठिण होता. माझ्यासाठी ते सगळंच खूप विचित्र होतं. मते माझे अमित अंकल आहेत. आणि त्यांच्यासोबतच लिपलॉक करणं माझ्यासाठी सगळ्यात कठिण होतं. आम्हाला हा सीन इंटिमेसी आणि गंभीरतेत दाखवायचा होता. या सिनेमात माझी भूमिका एका मूक-बधिर मुलीची होती जिला प्रेम मिळवायचं होतं.''
एवढंच नव्हेतर या सगळ्यानंतर जया बच्चन यांनी राणी मुखर्जीवर नाराजीही व्यक्त केली होती. काही रिपोर्ट्सनुसार, राणी मुखर्जी आणि अमिताभ बच्चन यांच्यातील लिप लॉक किसिंग सीनमुळे बच्चन कुटुंबात मोठी खळबळ उडाली होती. या सगळ्याचा जया बच्चन यांना खूप मनस्तापही झाला होता. लिपलॉक सीनमुळे जया बच्चन राणी मुखर्जीवर प्रचंड संतापल्या होत्या. एवढंच नव्हेतर जया बच्चन यांना असंही वाटू लागलं होतं की, राणी मुखर्जीला त्यांचे कुटुंब सुखी असावं असं वाटत नव्हतं.
असंही म्हटलं जातं की राणी मुखर्जी आणि वडिलांचा लॉक सीन पाहून अभिषेक बच्चनही चांगलाच संतापला होता आणि त्यामुळे त्याने अभिनेत्रीपासून दुर व्हायचा निर्णय घेतला. याआधी राणी मुखर्जीने राममध्ये कमल हासन आणि बंटी और बबलीमध्ये अभिषेक बच्चनसोबत इंटीमेट सीन दिले होते.