सपना चौधरीसोबत हे काय घडलं..स्टेजवर येऊन त्याने छेडलं...लोक फक्त पाहात राहिले

एकदा एका लाइव्ह शोमध्ये सपना चौधरीची एका मुलाने तिची छेड काढली होती, ज्यामुळे तिला खूप मनस्ताप झाला होता.

Updated: May 13, 2022, 03:45 PM IST
सपना चौधरीसोबत हे काय घडलं..स्टेजवर येऊन त्याने छेडलं...लोक फक्त पाहात राहिले title=

मुंबईः हरियाणाची प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीची फॅन फॉलोविंग खूप मोठी आहे, पण चाहत्यांचं प्रेम कधीकधी तिच्यासाठी त्रासदायक ठरते. एकदा एका लाइव्ह शोमध्ये एका मुलाने तिची छेड काढली होती, ज्यामुळे तिला खूप मनस्ताप झाला होता,

सपना चौधरी ही एक अशी डान्सर आहे, जिच्या डान्सवर आजही लोक भरभरून प्रेम करतात. ती जिथे जाते तिथे लोकांची गर्दी असते. पण कधी कधी या गर्दीमुळे ती अडचणीतही येते. एकदा परफॉर्म करताना तिच्यासोबत असा काही घडलं की आजपर्यंत ती गोष्ट विसरली नसेल.

सपना चौधरीने तिचे नाव कमावण्‍यासाठी खूप मेहनत घेतली आहे. मात्र लाइव्‍ह शोमध्‍ये अनेकवेळा तिला अशा गोष्टींचा सामना करावा लागतो की ज्यामुळे प्रचंड मनस्ताप होतो..असाच काहीसा प्रकार घडला जेव्हा एक व्यक्ती तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करत होती आणि लोक तिच्याकडे टक लावून पाहत होते. नुकताच असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक तरुण बळजबरीने सपनाजवळ कसा पोहोचतो आणि तिच्याशी गैरवर्तन करतो हे स्पष्ट दिसत होते.

सपना चौधरीला अनेकदा लाईव्ह शोमध्ये असभ्य वर्तन करणार्‍यांचा सामना करावा लागतो. सपना चौधरी तिच्या डान्स शोमध्ये अशाच काही क्षणांची शिकार झाली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये, सपना चौधरी हरियाणवी गाण्यावर लाल रंगाच्या ड्रेसमध्ये स्टेजवर परफॉर्म करताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहाल की एक मुलगा तिच्या खूप जवळ येतो आणि तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करतो. सपना सुध्दा हुशारीने त्या मुलाला स्वतःपासून दूर करते.

जेव्हा तो मुलगा गैरवर्तन करतो, तेव्हाच प्रेक्षकांमध्ये बसलेले अनेक लोक हसताना आणि मोबाइलवर व्हिडिओ बनवताना दिसतात, त्यावर सपना चौधरीही भडकते. असे अनेक व्हिडिओ इंटरनेटवर उपलब्ध आहेत जे सपनाच्या जुन्या दिवसांच्या कटू आठवणींना उजाळा देतात. सपनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर दररोज चांगलाच व्हायरल होत आहे.